Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रीय लोकशाही आघीडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड

Spread the love

राष्ट्रीय लोकशाही आघीडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. एनडीएतील ज्येष्ठ नेते, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांनी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जदयु नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लोकजनशक्ती पार्टीचे
राष्ट्रीय लोकशाही आघीडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. एनडीएतील ज्येष्ठ नेते, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांनी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जदयु नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान व एनडीएच्या अन्य नेत्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित खासदारांनी हात उंचावून मोदी यांच्या नेतानिवडीचं हात उंचावून समर्थन केलं. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा संपूर्ण सभागृहाने दिल्या.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित एनडीएच्या बैठकीत मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मोदींची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. एनडीएच्या ३५३ नवनिर्वाचित खासदारांनी मोदींची नेतेपदी निवड केल्याचे शहा म्हणाले.
दरम्यान, त्याआधी भाजपच्या संसदीय पक्षनेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यास माजी अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!