नक्षलवाद्यांना सोडणार नाही. आमचा प्लॅन तयार , लवकरच तो कृतीतून दिसेल : पोलीस महासंचालकांचा इशारा

Actor Navdeep, Co Founder C Space Along With Rakesh Rudravanka - CEO - C Space
आमचा अॅक्शन प्लॅन तयार आहे. नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल. लवकरच तुम्हाला कृतीतून दिसेल, असा गर्भीत इशारा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी नक्षलवाद्यांना दिला आहे. महाराष्ट्र दिनाला गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. यात १५ पोलीस शहीद झाले. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी आज गडचिरोलीत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते .
ते पुढे म्हणाले कि , नक्षलवादी हल्ल्यात ठार झालेल्या गाडीच्या चालकालाही शहीदाचा दर्जा दिला जाईल. त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत केली जाईल, नक्षलवाद्यांचा हल्ला दुर्दैवी होता. नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे हा स्फोट घडवून आणला. यासाठी कशाचा वापर केला गेला आणि नक्षलवाद्यांच्या कुठल्या दलाने हा स्फोट घडवला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याने आमचे मनोबल खच्ची होणार नाही. आम्ही नक्षलवादाविरोधात कारवाई सुरूच ठेवणार आहेत. पूर्ण ताकदीने कारवाई करू. नक्षलवाद्यांना सोडणार नाही. आमचा प्लॅन तयार आहे. लवकरच तो कृतीतून दिसेल. झालेल्या चुका सुधारू, असं सांगत जयस्वाल यांनी नक्षलवाद्यांना इशारा दिला आहे.
निवडणुकीत खोडा घालण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न मोडून काढला. यामुळे नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. पोलीस दल गाफिल नव्हतं. आताच्या परिस्थितीचा आढावा घेऊन कारवाईत सुधारणा करू. मी स्वतः गडचिरोलीच्या एसपी पदावर काम केलंय. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आताच्या परिस्थितीनुसार आढावा घेऊन रणनितीत बदल करू. संपूर्ण आव्हानांचा सखोल आभ्यास करू आणि पुन्हा अशा घटना होणार नाही याचीही काळजी घेऊ. तीच चूक पुन्हा करणार नाही. हल्ल्यातून नक्कीच धडा घेऊ, असं सुबोधकुमार जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.