महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आज नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करण्यात आले. नागपूरयेथील संविधान चौकावर विदर्भ बळीराजा पार्टी (तृतीयपंथी) आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. ‘हा महाराष्ट्र दिवस नाही, विदर्भ दिवस आहे’ अशी घोषणाबाजी करण्यात येत होती. दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले होते. संविधान चौकाच्या बाजूला असलेल्या विधानभवन येथे चारही बाजुंना पोलीस बंदोबस्त होता. विदर्भ बळीराजा पार्टी (तृतीय पंथ) यांनी काळे कपडे परिधान करून या आंदोलनात सहभाग घेऊन महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदवला.