Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“पीएम नरेंद्र मोदी” चे प्रदर्शन आता ५ एप्रिलला होणार नाही …चित्रपटाचे दिग्दर्शक निवडणूक आयोगाच्या रडारवर

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ या हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे ५ एप्रिल या नियोजित तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही, असे चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रदर्शनाची पुढील तारिख त्यांनी सांगितलेली नाही, लवकरच ती कळवण्यात येईल असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत असल्याचे कारण निर्मात्यांच्या वकिलांनी इंडिअन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. विरोधकांच्या मते हा मोदींच्या वैयक्तिक प्रचारासाठी बनवण्यात आलेला चित्रपट आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक उमंग कुमार देखील निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाला एक पत्र पाठवले असून यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी परवानगी द्यायची कि नाही हे बोर्डाने ठरवावे, त्यांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल. दरम्यान, या चित्रपटात मोदींची प्रमुख भुमिका साकारलेला अभिनेता विवेक ओबेरॉय याने विरोधकांवर टीका करताना म्हटले की, वरिष्ठ वकिल असलेले अभिषेक सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी उगाचच या चित्रपटाविरोधात जनहित याचिका दाखल करु नये. ते चौकीदाराच्या काठीला घाबरले आहेत का? असा सवाल करताना मोदींना आम्ही हिरो करण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे त्याने म्हटले आहे. मोदी हे केवळ माझ्यासाठी नाही तर करोडो देशी आणि परदेशी लोकांसाठी हिरो आहेत. ही एक प्रेरणादायी कथा असून ती आम्ही मोठ्या पडद्यावर आणली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!