Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या : वंचित बहुजन आघाडीला पक्ष म्हणून मान्यता…

Spread the love

1. वंचित बहुजन आघाडीला पक्ष म्हणून मान्यता

2. वंचित आघाडीच्या भीतीनेच पवारांची माढ्यातून माघार; अकोल्यातून लढावे, मी जिंकवून देतो – प्रकाश आंबेडकर

3. भायखळा फ्रूट मार्केटमधील आगीत दोन गाळे भस्मसात; आग आटोक्यात. आगीचं कारण कळू शकलेलं नाही.

4. फसवेगिरी हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे वैशिष्ट्य; शरद पवारांची भाजपवर टीका

5. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला सत्ता हवी – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

6. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे यांना उमेदवारी.

7. वंचित बहुजन आघाडीकडून नागपूरसाठी सागर डबरासे यांची उमेदवारी जाहीर.

8. कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढवणार

9. सातारा लोकसभेतून शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी जाहीर , माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश.

10 . जप, शिवसेना युती म्हणजे फेविकॉल हा मजबूत जोड, त्याला कुणी तोडू शकत नाही – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

11. सांगलीत काँग्रेसला धक्का; माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा दिला राजीनामा

12. गोंदिया: सुनील मेढेंना भाजपकडून लोकसभा उमेदवारी जाहीर

13. काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर; हिंगोलीतून सुभाष वानखेडे, रामटेकमधून किशोर गजभिये, अकोल्यातून हिदायत पटेल आणि चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर यांना उमेदवारी जाहीर

14. वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर भाजपला मदत करीत आहेत,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोंगेंद्र कवाडेंचा आरोप.

15. भारताच्या राजकारणात राहुल गांधी यांची पत काय हे सर्वच जाणतात: संबित पात्रा

16. यवतमाळ : रिपाई आठवले गटाची बैठक, युतीत सन्मानजक वागणूक मिळत नसल्याने प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, अनिल गोंडाने, मोहन भोयर, महेंद्र मानकर, गोविंद मेश्राम, नवनीत महाजन यांनी भूमिका मांडली.

17. जम्मू काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार; लष्कराचा एक जवान शहीद

18. काँग्रेस नेते रणजितसिंह निंबाळकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार

2 thoughts on “News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या : वंचित बहुजन आघाडीला पक्ष म्हणून मान्यता…

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!