महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बाजी

social media
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गेल्या वर्षात घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या संयुक्त परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकमधील किमान शंभरावर विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाकरीत एकूण ६५० जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षेत एससी प्रवर्गातून राहूल अशोक केदारे याने राज्यात प्रथम, सोनाली देवीदास अहिरे हिने एससी महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम, भगवंत संतोष भगदाणे याने एनटी बी प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि अर्चना पंढरीनाथ निकम हिने एससी प्रवर्गातल खेळाडूंमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर, अमोल पांडूरंग मांजरे याने एससी प्रवर्ग खेळाडूंमध्ये राज्यात चतुर्थ , स्वप्नील भगवान दळवी याने खुल्या प्रवर्गातील खेळाडूंमध्ये राज्यात चतुर्थ, सुनिल तुळशीराम खैर याने ओबीसी प्रवर्गात राज्यात सातवा आणि वंदना राजाराम कनोजा हिने एससी प्रवर्गातून राज्यात चतुर्थ क्रमांक पटकाविला.