Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सिद्धू ट्विट : पीएम साहब आप का डायलॉग खुद्दारी, किसी और का डायलॉग गद्दारी ?

Advertisements
Advertisements
Spread the love

नवजोत सिंग सिद्धू पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी चर्चा करूनच काश्मीर प्रश्न सुटू शकतो असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सिद्धूंवर अनेक नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता आणि त्यांना पाकिस्तानात जा असंही सुनावलं होतं. तसंच कपिल शर्मा शोमधून त्यांची हकालपट्टी करा अशीही मागणी केली होती. परिणामी कपिल शर्मा शोमधून सिद्धू यांची हकालपट्टीही करण्यात आली. सगळ्या टीकेला उत्तर देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इम्रान खान, नवाज शरीफ यांच्यासोबतचे फोटो ट्विट करीत “पीएम साहब आप करे तो खुद्दारी कोई और करे तो गद्दारी ” असे म्हणत तुम्हाला सत्याचा सामना करावा लागेल आणि त्यापुढे तुमची हार होईल असाही संदेश लिहिला आहे. नहीं डरता तुम्हारे भाडे के ट्रोलसे असेही ट्विटच्या शेवटी सिद्धू यांनी लिहिलं आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!