Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देश जो निर्णय घेईल तोच योग्य पण भारताने पाकला पराभूत करावे : सचिन

Advertisements
Advertisements
Spread the love

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळावं की नाही याबाबत सुनील गावस्कर यांनी मत मांडल्यानंतर या प्रश्नावर आता भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही सुनील गावस्कर यांच्याच शब्दात आपली भूमिका मांडली आहे . यासंदर्भात बोलताना सचिन म्हणाला की, ” भारताने नेहमीच पाकिस्तानविरुद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना मैदानात पराभूत करायला हवे. जर पाकिस्तानबरोबर आपण खेळलो नाही तर आपल्याकडून त्यांना दोन गुण बहाल होतील. त्यामुळे मला तरी असे वाटते की आपण पाकिस्तानला दोन गुण देऊ नये. पण माझ्यासाठी देश जो निर्णय घेईल तोच योग्य असेल.” आतापर्यंत भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा एकही सामना गमावलेला नाही.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!