Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हमे जोश कि नही , होश कि जरुरत : शत्रुघ्न सिन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

‘आपण ‘जोश’मध्ये ‘होश’ हरवून बसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे’ असं म्हणत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुलवामा हल्ल्याविषयी मौन सोडलंय. पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शहीद जवानांना आर्थिक मदत केली, या हल्ल्याचा निषेधही व्यक्त केला. या हल्ल्याबाबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘पुलवामातील हल्ला अतिशय भ्याड आणि लाजिरवाणा प्रकार आहे. आपण या हल्ल्याविरोधात कठोर पावलं उचलली पाहिजेत. तिथे जे घडले त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड राग खदखदतोय हे मला माहीत आहे. परंतु, पुलवामा हल्ल्याचे प्रत्युत्तर देताना आपण ‘जोश’मध्ये ‘होश’ हरवून बसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपण सगळेच भारतीय सध्या घायाळ झालो आहोत. त्यामुळे केवळ रागाच्या भरात काही पाऊल उचलण्याऐवजी आपण सगळ्या परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन पुढची दिशा ठरवली पाहिजे.’ शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यानंतर आता उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!