Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप -सेनेचे सूत जमल्याची चिन्हे !!

Advertisements
Advertisements
Spread the love

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाम या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेला गुंता सुटला असल्याची चर्चा असून लोकसभेमध्ये शिवसेना २३ तर भाजपा २५ जागांवर लढण्याबाबत तर विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी फिप्टी-फिप्टी जागा लढण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. तसेच विधानसभेसाठी प्रत्येकी १४४ जागांवर लढण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. तसेच पालघरची जागा आपल्याला देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला भाजपाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही जागा शिवसेनेला सोडल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही दिवसांपासून २०१४ साली केंद्रात एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपकडून दुय्यम वागणूक मिळत असून राज्यात सातत्याने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची घेतलेली भूमिका यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर भाजपानेही शिवसेनेच्या विरोधात आग्रमक धोरण स्वीकारले होते. मात्र राष्ट्रीय पातळीवर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाला दोन पावले मागे घेत शिवसेनेशी युतीसाठी बोलणी करावी लागली असे बोलले जाते .
या सर्व घडामोडीमुळे शिवसेनेचा भाजप विरोध म्हणजे कपातील वादळ ठरले . तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशी या दोन्हीही पक्षांची अवस्था आहे. सतत चार वर्षांपासून आम्ही खिशात राजीनामे घेऊन काम करतो अशी भाषा वापरणाऱ्या शिवसेनेला अखे भाजपसोबत जुळवून ज्ञावे लागत आहे आहे हेच खरे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!