शबाना आझमी यांना स्वाइन फ्लू

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाइन फ्लू
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाइन फ्लू झाला आहे. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शबाना आझमी यांना सर्दी- खोकला झाल्याने त्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्या असताना स्वाइन फ्लूचे निदान झाले. त्यानंतर शबाना आझमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शबाना यांनी मात्र या आजारपणामुळे मिळालेल्या वेळेचा सदुउपयोग करण्याचे ठरवले आहे. ‘मला असा विश्रांतीसाठी, स्वत:साठी फार कमी वेळ मिळतो. पण आता मला मिळालेल्या या सक्तीच्या विश्रांतीचा मी सदुपयोग करणार आहे. मी या वेळेत आत्मपरीक्षण करणार आहे. या आजारपणकडे मी माझ्या व्यग्र वेळापत्रकातून मला मिळालेल्या ब्रेकसारखे पाहणार आहे.’ असं त्या म्हणाल्या.