गल्ली ते दिल्ली : महत्वाच्या बातम्या …

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारीला नाशिकमध्ये; भारतीय बनावटीची धनुष तोफ लष्कराकडे सुपूर्द करणार
२. औरंगाबाद : शेतकरी आत्महत्यांची प्रलंबित प्रकारणे तात्काळ निकाली काढण्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे आठही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; मराठवाड्यात गेल्या वर्षभरातील सुमारे शंभर प्रकरणे प्रलंबित
३. मुंबई: डॉ. मनमोहन सिंग हे तल्लख बुद्धीमान पण, हातपाय बांधलेले पंतप्रधान होते; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका , आगामी निवडणूक भाजपची नाही, तर देशाची आहे.
४. चॅनल निवडण्यासाठी ‘ट्राय’ची ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ
५. पुणे: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) अध्यक्षपदी प्रफुल्ल छाजेड यांची निवड
६. औरंगाबाद: थकीत देणी मिळावी या मागणीसाठी कंत्राटदारांचा महापालिका आयुक्तांना घेराव
७. ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी सहआरोपी राजीव सक्सेनाला दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टानं १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली
८. पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक शिरसाट हत्याप्रकरणी दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
९. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेतली भेट
१०. पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचा जवान बलजीत सिंग शहीद
११. दिल्ली: खासदाराच्या कारनं संसदेच्या आवारातील बॅरिकेड्स उडवले, हायअलर्ट जारी
१२. राहुल गांधी हे विदेशी कंपन्यांसाठी लॉबिंग करताहेत; केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचे प्रत्यारोप
१३. पुणे: ब्रेन डेड घोषित केलेल्या ३५ वर्षांच्या तरुणानं मूत्रपिंड, यकृत आणि डोळे दान करून दिलं तिघांना जीवदान
१४. सीबीआयचे अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, १ लाख रुपये दंड आणि दिवसभर कोर्टात थांबण्याची शिक्षा
१५. राफेल करारातील सत्यता हळूहळू समोर येत आहे: राहुल गांधी
१६. राफेल: मोदी भ्रष्टच, त्यांना तुरुंगात डांबलं पाहिजे; राहुल गांधींचा हल्लाबोल
१७. नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा आमचा संकल्प आहे: अमित शहा, भाजप अध्यक्ष
१८. औरंगाबाद: वाढीव वीजदराच्या निषेधार्थ उद्योजक, व्यापारी संघटनांनी केली वीज बिलांची होळी
१९. दिल्ली: हॉटेल ‘अर्पित पॅलेस’मध्ये लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा १७ वर