मनसेने लावले ५०० आदिवासी जोडप्यांचे विवाह

निमित्त राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाचे …
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालघर जिल्ह्यात बोईसर येथे शनिवारी सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ५०० आदिवासी जोडप्यांचे यावेळी लग्न लावण्यात आले. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह या विवाहसोहळयाला उपस्थित होते.
राज ठाकरेंनी या लग्नसोहळयाला उपस्थित रहात वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या तसेच त्यांना भावी जीवनासाठी आशिर्वादही दिले. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी टि्वट करुन आपला आनंद व्यक्त केला. नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, ह्या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला असे राज यांनी म्हटले आहे कि , नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, ह्या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला. पक्षातर्फे पालघर येथे आयोजित ५०० आदिवासी जोडप्यांच्या सामूहिक लग्नसोहळा. ह्याबद्दल पक्षाचे अविनाश जाधव, कुंदन संखे आणि महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन आणि नव-दाम्पत्यांना शुभेच्छा. राज यांचा मुलगा अमित ठाकरे यांच २७ जानेवारीला लग्न झालं. फॅशन डिझायनर मिताली बोरुडेबरोबर अमित विवाहबंधनात अडकला. या लग्नसोहळयाला राजकारण, उद्योग आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती .