देव आनंद यांचा नातू ऋषी आनंदची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

अभिनेते देव आनंद यांनी आपल्या कसदार अभिनयाने रुपेरी पडदा गाजवला. आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत आता देव आनंद यांचा नातू ऋषी आनंद बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाला आहे. गोविंदाच्या सुपरहिट ‘साजन चले ससुराल’ चित्रपटाच्या रिमेकमधून तो बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. ‘साजन चले ससुराल २’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. याबाबत बोलताना ऋषी म्हणाला की, ‘बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. हा माझा पहिलाच चित्रपट असल्याने कदाचित उत्सुकता जास्त असेल. परंतु, या घडीला चित्रपटाबद्दल काहीही बोलणे फार योग्य ठरणार नाही. ‘
‘साजन चले ससूराल’ या चित्रपटाची निर्मिती मन्सूर अहमद सिद्धीकी यांनी केली होती. त्याच्या पुढच्या भागाची निर्मितीदेखील तेच करणार आहेत. या चित्रपटात ऋषी आनंदसोबत चंकी पांडे, आर्य बब्बर, हेमंत पांडे, सोनल मोन्टेरिओ आणि इशिता राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.