औरंगाबादची शलाका गाडे मोठ्या पडद्यावर….

औरंगाबादची शलाका गाडे मोठ्या पडद्यावर….
लहानपणापासून अभिनेत्री बनण्याची जिद्द मनाशी बाळगून त्या दिशेने प्रवास करणारी औरंगाबादची शलाका गाडे हिने अखेर आपल्या संघर्षावर विजय मिळवून मोठ्या पडद्यापर्यंत मजल मारली आहे. तिचा “दहावी” हा चित्रपट महाराष्ट्र भर प्रदर्शित होत असून याबद्दल उत्सुकता आहे.
सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या नाटयशास्त्र विभागाची पदवी घेतल्यानंतर शलाका हिने मुंबईत विद्यापीठातून एम.ए. ड्रामापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.शलाकाने महाविद्यालयीन जीवनात युवक महोत्सवात एकांकिका, नाटके केली. मी लाडाची मैना तुमची, द लोअर डेप्टथ, रशियन, मन्टों के अफसाने, अभिज्ञान शाकुंतल, यात भूमिका साकारल्या. याबरोबरच तीने व्यावायिक नाटकांमध्ये ठलवा, कार्यकर्ता, यासह स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, मुंबई मेरी जान यात भूमिका साकारल्या. शलाकाने, संपूर्ण शिर्डी दर्शन, (डाॅक्यूमेंटरी), मेक इन इंडिया , लाईफ इज लाईफ अशा अनेक शॉर्टफिल्म सोबतच लक्ष्मी, उनाड, वंजर या लवकरच येणा-या चित्रपटात तिने भूमिका साकारल्या आहेत. लक्ष, प्रेमा तुझा रंग कसा ? या छोट्या पडद्यावर काम करणा-या शलाकाने लिफ्टमॅन या वेबसिरीज बरोबरच हिंदी अलबमध्येही आपली अदाकारी दाखवली आहे.
स्वत:ची जिद्द आणि पालकांच्या प्रोत्साहनामुळे लहानपणापासूनच अभिनयाच्या करिअरची वेगळी वाट धरून शलाकाने मुंबईत यशाच्या शिखराकडे वाटचाल सुरू केली आहे.
आपल्याला प्रा. डॉ. दिलीप घारे, डॉ. वामन केंद्रे, डॉ. मंगेश बनसोड, डॉ. शफात खान, हिमानी शिवपुरी, गोविंद नामदेव, मयुर आणि पियुष राऊत, सुधीर जाधव, निळकंठ गुरुजी आपले आई-वडील बाबा गाडे आणि कल्पना गाडे आदींनी प्रोत्साहन दिल्याचे शलाका सांगते.
नवोदित कलावंतांना या क्षेत्रात आवड असेल तर त्यांनी जरूर यावे मात्र योग्य ते शिक्षण घेऊन येणे त्यांच्या हिताचे होईल. माझ्या अनुभवावरून सांगते फिल्म इंडस्ट्री वाईट नाही , आपल्या चांगुलपणावर अवलंबून आहे. गेल्या पाच वर्षांपासून या क्षेत्रात मी मुंबईत पूर्णवेळ काम करतेय. या क्षेत्रात संघर्ष मोठा आहे पण इतर क्षेत्र सारखाच या क्षेत्रातही कष्टाला वाव आहे असे शलाकाचे मत आहे.