संसदेत मला बोलू दिले नाही… माझा आवाज दाबला गेला… – अमोल कोल्हे

भाजप नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे लोकसभेत बोलायला उभे राहिले होते. मात्र त्यांच्या काही वाक्यानंतरच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी “हो गया हो गया…” म्हणत विषय पूर्ण करण्याची सूचना केली. त्यानंतर पुढच्याच सेकंदाला अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला. संसदेत घडलेल्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्ये होत असल्याने राज्यात वाद सुरु आहे. मविआ खासदारांच्या निदर्शनानंतर आज राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शून्य प्रहारा’मध्ये शिवरायांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी केली. ते म्हणाले कि, “छत्रपती शिवराय देव नाहीत पण देवापेक्षा आम्हाला कमी नाहीत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये, असे अमोल कोल्हे सांगत असतानाच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी “हो गया हो गया…” म्हणत विषय पूर्ण करण्याची सूचना करून त्यांचा माईक बंद केला.
मी जो विषय मांडणार होतो, त्या विषयाला शून्य प्रहारामध्ये वेळ देण्यात आला होता. पण वेळ देऊनही मला बोलू दिले नाही. माझा आवाज दाबला गेला. माझे बोलणे सुरु झाल्यावर अवघ्या दोन ते तीन वाक्यानंतर मला खाली बसण्याची सूचना केली. हो गया हो गया म्हणत माझा माईक बंद केला.माझा आवाद दाबला असेल पण शिवभक्तांच्या आवाजाने तुमच्या कानठळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत”, असा इशारा देत अमोल कोल्हेंनी संसेदत घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.
https://www.facebook.com/dailymahanayak/videos/1263092297804287/
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055