Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : विद्यार्थ्याचा बुरखे घालून खून करण्याचा प्रयत्न

Spread the love

औरंगाबाद – ग्राफिक डिझाईन च्या विद्यार्थ्याचा काल संध्याकाळी ७.३०वा. तीसगाव चौफूलीवर चौघांनी तोंडावर कपडे बांधून नानचाकू व लाठ्या काठ्याने मारहाण केली.या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात चार अज्ञात इसमांविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाआज संध्याकाळी दाखल झाला आहे. कुणाल अशोक मानकर (२२) रा.एन१३भरतनगर हडको असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने  म्हटले की, त्याचे वडील अशोक मानकर यांचे वाळूज औद्योगिक परिसरात सी १११ या भूखंडावर कुरियर चे आॅफिस आहे.ते किरायाने घेतले आहे. जागा मालक व त्याचा भाऊ यांचे त्या भूखंडावरुन वाद सुरु आहे. दरम्यान दोन आठवड्यांपासून फिर्यादी कुणाल मानकर वडलांचे कुरियर कार्यालयात नियमित येत असे. २० जुलै रोजी तीसगाव चौफूली जवळ रेल्वे उड्डाणपुलाजवळ चौघांनी स्वता:चे चेहरे कपड्याने झाकून कुणाल ला बेदम मारहाण केली.

दरम्यान यावेळेस पोलिसांची जीप शहराकडे येत असतांना चौघांनी पोलिसांची गाडी पाहताच मोटरसायकलवर तीसगावात धूम ठोकली.फिर्यादी कुणाल ने वडलांना फोनकरुन घटनास्थळी बोलावले.फिर्यादी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला असता पोलिसांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. आज उपचारानंतर फिर्यादीने छावणी पोलिसांकडे तक्रार दिली.पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग भागिले करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!