Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : विनयभंगाचा आरोप असलेल्या आरोपीला अटक , छंद म्हणून बाळगायचा पिस्तूल …

Spread the love

औरंगाबाद : विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर छंद  म्हणून पिस्तूल बाळगणाऱ्या  रिक्षाचालक क्रांती चौक   पोलिसांनी पाठलाग करून काल रात्री ८.३० वा जेरबंद केला. आवेज असलम कुरेशी (२२) रा सिल्लेखाना असे अटक आरोपीचे नाव आहे, याच्यावर यापूर्वी क्रांती चौक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस आरोपीचा शोध घेत असताना ,  क्रांती चौक पोलिसांना खबऱ्याने  माहिती दिली की, आवेज सध्या कमरेला पिस्तूल लावून दहशत गाजवतो त्यानुसार पीएसआय विकास खटके यांनी पथकासह समतानगर परिसरात जात पाठलाग करून आवे ज कुरेशीला अटक केली. त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, सहज छंद म्हणून वापरत आहे कोणालाही मारण्यासाठी आणले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार या पिस्तूल ची किंमत १५ हजार रु. आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पीआय विशाल इंगळे करत आहे

कुलगुरुंच्या आवारातून चंदनाचे झाड चोरले

सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवत आज पहाटे ४ च्या सुमारास चौघांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या निवासस्थनातील १० हजार रु कि चे १० किलो वजनाचे चंदनाचे झाड कापून चोरून नेले या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

चोरटयांनी सोबत कटर आणले होते.सुरक्षा रक्षक संजय राजपूत यांच्या गळ्याला चाकू लावून झाड कापून नेले गुन्हा घडल्यानंतर तब्बल १२ तासांनी गुन्हा दाखल झाला या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विशाल बोडखे करत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!