Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : काँग्रेस नेते राज बब्बर यांना दोन वर्षाची शिक्षा

Spread the love

लखनऊ : प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना एमपी एमएलए कोर्टाने  दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना कोर्टाने  ८५०० रुपयांचा दंडही ठोठावला. तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काही वेळातच त्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे दोन जामीन आणि वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला.

राज बब्बर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले . शिक्षा सुनावली त्यावेळी राज बब्बर कोर्टात हजर होते. २ मे १९९६ रोजी मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. राज बब्बर त्यावेळी समाजवादी पक्षाचे उमेदवार होते. मतदान अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे ते प्रकरण होते. दरम्यान राज बब्बर एका महिन्याच्या आत जिल्हा न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील करू शकतात. एमपी एमएलए कोर्टाने राज बब्बर यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

असे आहे प्रकरण?

१९९६ मध्ये सरकारी कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी मतदान अधिकाऱ्याने राज बब्बर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मतदान अधिकारी श्रीकृष्ण सिंह राणा यांनी २ मे १९९६ रोजी वजीरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. राज बब्बर आणि अरविंद यादव यांच्यासह अन्य काही जणांविरोधातही तक्रार केली होती. राज बब्बर हे काही समर्थकांसमवेत त्यावेळी मतदान केंद्रात घुसले आणि मतदान प्रक्रियेत बाधा आणली. सरकारी कामात अडथळा आणण्याबरोबरच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केले. तसेच मारहाण केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!