Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : चरस विक्री करणारा ४० हजाराच्या मुद्देमालासह अटकेत

Spread the love

औरंगाबाद – बलात्काराच्या गुन्ह्यात दहा वर्षापुर्वी शिक्षा भोगून आलेल्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला ८० ग्रॅम चरस ज्याचे मूल्य ४० हजार र, आहे या अमली पदार्थासहीत गुन्हेशाखेने अटक केली.

दीपक करम सिंग मळके (६०) रा. बल्लू गल्ली नारेगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. हे पूर्ण कुटुंब पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे २०१० साली एका महिलेचे अपहरण करून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात सिडको औद्योगिक पोलिसांनी अटक केली होती, या प्रकरणात मळके दोन वर्ष शिक्षा भोगून बाहेर आला होता.

नारेगावातील रंजना नामक महिलेकडून तो ठोक भावात चरस खरेदी करतो. परिसरात विक्री करतो. अशी माहिती गुन्हेशाखेच्या तपासात उघड झाली आहे, वरील कारवाई पोलीस उपायुक्त अपर्णा गीते , सहाय्य्क पोलीस आयुक्त विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय काशिनाथ महांजोळ , पीएसआय कल्याण शेळके पोलीस कर्मचारी राजेंद्र साळुंके, विजय निकम, गीता ढाकणे, शेख हबीब विरेश बने यांनी पार पाडली

Click to listen highlighted text!