Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : साडेतीन तोळे सोन्याचे गंठण आणि साखळी लंपास करीत चोरटे पसार

Spread the love

औरंगाबाद – आज(शनिवारी) सकाळी साडेसात ते पावणेआठ च्या वेळेत दोन मोटरसायकलस्वारांनी निवृत्त शिक्षिका व निवृत्त प्राध्यापकांचे गळ्यातून साडेतीन तोळे सोन्याची गंठणे अंदाजे (१ लाख ७५ हजार रु. मूल्य असलेली) लंपास केली. या प्रकरणी मुकुंदवाडी आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

सी.सी.टि.व्ही फुटेजमधे दोन्ही ठिकाणी मंगळसूत्र चोर्‍या करणारे चोरटे एकच असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.
कमल अंबादास कुलकर्णी (८०) रा.महाजन काॅलनी या दूध आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळेस मोटरसायकलवर दोन चोरट्यांनी येत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चैन हिसकावून बन्सीलालनगरकडे पळ काढला.

बन्सीलालनगरातील महापालिका रुग्णालयासमोर ७.४५वा. विष्णूदास बजाज (६२) निवृत्त प्राध्यापक दूध आणण्यासाठी गेले असता त्यांना वरील भामट्यांनी एक चिठ्ठी देत पत्ता विचारण्याचा बहाणा करंत त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याची चैन हिसकावून पळ काढला. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वरील दोन्ही घटनास्थळी पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी, सचिन सानप, अविनाश आघाव यांनी भेट देत पाहणी केली. गुन्हेशाखेच्या अधिकार्‍यांनी चोरट्यांचा शहराबाहेर ४५ कि.मी. पर्यंत माग काढला. दोन्ही पोलिस ठाण्यांची पथके आणि गुन्हेशाखेचे पथक चोरट्यांच्या मागावर आहेत. यामधे इराणी गॅंगचा हात असण्याची दाट शक्यता पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी व्यक्त केली आहे. लवकरच चोरटे हाती लागतील असा विश्वास वरिष्ठ सुत्रांनी व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!