Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबाद जिल्ह्यातील निराधार व दिव्यांगाना रेशनकार्डचे वाटप

Spread the love

औरंगाबाद : समाजातील वंचित, निराधार दिव्यांग, तृतीयपंथीय आणि देहविक्री करणाऱ्या महिलांना मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेशनकार्डाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. आज जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने नवीन 200 रेशन कार्डचे वाटप जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका प्रशासक आस्तिकुमार पांडेय, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, तसेच मराठवाडा विकास संस्थाचे प्रतिनिधी, माई सेवाभावी संस्थाचे अल्ताफ शेख,एड्स नियंत्रण सोसायटीचे जिल्हा पथक निरिक्षक संजय पवार, साहित्यिक टी.एस.चव्हाण यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

सुनील चव्हाण म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रकाराचा योजना राबवित आहे. आज प्रतिनिधीक स्वरुपात 200 शिधापत्रिकेच्या माध्यमातून प्रत्येकाला अन्न मिळवून देऊन पुरवठा विभागामार्फत अन्न सुरक्षा कायद्याची अंमजबजावणी पूरवठा विभागामार्फत करण्यात येत आहेत. याचबरोबर निराधार महिलांना श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजनेसह उज्वला गॅस जोडणी, घरकूल, रोजगार हमी योजनेतून रोजगार, अटल पेन्शन येाजना या सारख्या विविध योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन काम करीत आहे.यासाठी वेळोवेळी विविध विभागानी लाभर्थ्यांचा कागदपत्राचा पाठपुरावा करावा, मूलभूत सोयी सुविधा निराधार, अनाथ, दिव्यांगा गरजूपर्यंत पोहचव्यात अशा सूचना देखील यावेळी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शिधा पत्रिका वाटपाच्या कार्यक्रमात प्रतिनिधीक स्वरुपात शेख रिहाना यांनी प्रतिक्रया मांडताना सांगितले की सदरील वितरीत केलेले शिधापत्रिका आधार जोडणीशी संलग्न करुन मिळाव्यात शिधापत्रिका उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे यांनी आभारही मानले. शेख अल्ताफ, संजय पवार, टी.एस. चव्हाण यांनी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या व शिधापत्रिका प्रमाणेच राहण्यासाठी हक्काचा निवारा म्हणून घरकूल उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. तसेच एचआयव्ही बाधित महिलांना देखील रेशनकार्ड देण्याबाबतची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली.
प्रतिनिधीक स्वरुपात रितीक नगराळे, पुष्पराज साबळे,अश्विनी साबळे, बद्रीनाथ लहाने, शिवाजी दांगड, लता पिंपळे, ज्योती कदम, आशा सारडा या लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!