Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Abhivyakti : Blog | ॲड.शिरीष कांबळे : आंबेडकरी चळवळ आणि मातंग समाजाच्या प्रगतीतील अडथळे..!!!

Spread the love

वर्ण व्यवस्था प्रमाणे अस्पृश्य वर्ग आणि त्यातील जाती या हिंदू नाहीत कारण अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती या ना शूद्र आहेत ना अतिशूद्र आहेत.ज्या हिंदू केवळ राजकीय मूल्य लक्षात ठेऊन गणल्या जातात परंतु मानल्या जात नाहीत.त्यापेक्षाही वर्ण व्यवस्थे प्रमाणे त्यांना माणूसच ग्रहीत धरले जात नव्हते म्हणूनच कदाचित किंबहुना डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्या महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह ची तुलना फ्रेंच राज्य क्रांतिशी सोबत केलेली होती.आम्ही हिंदू नाहीत जर आम्ही हिंदू असतो तर नाशिक काळा राम मंदिर प्रवेश सत्यागृहास सनातनी हिंदू धर्मीय लोकांनी केला नसता.

पूर्वापार चालत आलेल्या जोड शब्द ज्यात मातंग- महार किंवा महार- मांग यांच्या जातीच्या नावाने प्रसिद्ध अश्या काही गृहतिके इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने समाज मनावर ताबा घेऊन प्रचलित केल्या गेल्या आहेत.एखाद्या लहान मुलाने एखादा शब्द उच्चारताना जरा उर्मट व उद्धट पद्धतीने उच्चारला तर लगेच त्याचे घरातील ज्येष्ठ मंडळी किंवा पालक त्या लहान मुलाच्या मनावर अधिराज्य परिणाम करणारे वाक्य बोलतात की असे मांगा महरा सारखे बोलू नये.इथेच जातीय वादाचे बाळकडूच त्या लहान निरागस मनावर बिंबवले जाते.याचाच दुसरा अर्थ असा होतो की असंस्कृत भाषा आणि गलिच्छ राहणारे म्हणजे मांग आणि महार.

औरंगाबाद येथील खून प्रकरण

नुकतेच औरंगाबाद येथे एका मातंग तरुणास पूर्वा श्रमीचे महार यांनी अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रात महार मांग वाद पेटवला जावा या उद्देशाने काही समाज द्वेष्टे प्रयत्न करताना दिसले.आणि जातीचे प्रेम आणि असुरक्षततेची भावना विषेतः मातंग समाजाच्या नावाने आणि समाजात पेर न्याचे काम करणारे कार्यकर्ते दिसून आले. अन्याय अत्याचार बलात्कार खून आमच्या अस्पृश्य वर्गावर नवीन नाही.

ज्याप्रमाणे आतापर्यंत अन्याय अत्याचार करणारे हे सवर्ण जातीतून होते तेव्हा मात्र हे समाज द्वेष्टे साधा निषेध करण्याचे औदार्य यांना दाखवावे वाटले नाही.नवरदेव पारावर गेला म्हणून मारहाण, गणपती मिरवणुकीत सरपंच नाचला म्हणून मारहाण, फाशी देऊन मारला एकुलता एक विधवा आईचा मुलगा,सरपंच मारला जातो स्मशान भूमी नाही, सवर्ण समाजातील स्मशान भूमीत अंत्यविधी करू दिल्या जात नाही, स्वतंत्र्य स्मशान भूमी नाही,पोलिसांनी केला अन्याय अत्याचार मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि फौजदारी संहिते प्रमाणे महिला आरोपीस अटक केली, तरुणास जिव मारले आणि अपघात दाखवणायची तरीही मांग समाज आणि द्वेष्टे शांत होते.

इथे या दोन बाब एकसमान होत्या त्याम्हणजे पीडित हे मातंग होते आणि जुलूम आणि अत्याचार गुन्हे करणारे हे सर्व सवर्ण होते.तेव्हा त्या प्रकरणात आवाज उठवणारे हे औरंगाबाद च्या प्रकरणात आवाज उठवणारे नेते कुठेच नव्हते.म्हणून जय भीम पेक्षा राम राम बरा !!! सवर्ण जेव्हा मांगा ला जवळ करतात पण मेल्या नंतर सुद्धा जातीचा विटाळ मात्र पाळतात.आणि अंत्यसंस्कार स्मशान भूमीत करू देत नाहीत हे इथले वास्तव मांग उघड्या डोळ्याने बघून सुद्धा शांत राहतात.

बाबासाहेबांच्या धर्मांतरात इतरही होते ..

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मातंग समाजाच्या परिषदा घेतल्या आहेत.तेव्हा केवळ अस्पृश्य हक्क आणि अधिकार याची लढाई होती.तथापि जेव्हा डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टो १९५६ ला बौद्ध धम्म स्वीकारला आणि तो सर्व अस्पृश्य अनुयायांना धम्माची दीक्षा दिली तेव्हा केवळ पूर्वाश्रमीचे महार लोकच होते असे काही नाही.त्यात मातंग, बंजारा आणि ओबीसी बांधव सुद्धा होते.इथूनच खरे महार मांग वादाची बिजे समाजात रुजली गेली.

.. म्हणून मातंग समाज मुख्य प्रवाहापासून दूर गेला

गावकी चे कामे सोडून द्या असा मूलमंत्र केवळ पूर्वा श्रमिचे महार यांनाच नाही तर सर्व अस्पृश्य समाजाला दिलेला मानवमुक्तीचा सोबतच सामाजिक सांस्कृतिक धार्मिक गुलाम गिरितून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्यायावर आधारित नव समाज निर्मानाची प्रक्रिया सुरू झाली.परंतु मातंग समाजातील तत्कालीन द्वेष्टे यांनी मातंग समाजाच्या प्रगतीचा शास्वत मार्ग कोणता हे समाजाला पटवून देण्यास अपयशी ठरले.सोबतच महार समाज सुद्धा बुद्ध धम्मातील बंधुत्वा सोबत आलेली जबाबदारी विसरून गेला.वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजाच्या प्रगतीचा आढावा जेव्हा वारूळ या पुस्तकात वाचायला आला तेव्हा लेखकाने महार समाजाने सोडलेली गावकीची कामे मातंग समाजाने मोठ्या हौशेने आणि आनंदाने स्वीकारली म्हणुन मातंग समाजीक शैक्षणिक  परिर्तनाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेला.

जय भीम पेक्षा राम राम बरा.!!!

अर्थातच गावकी हीच महार मातंग भावकीचा पक्का पाया होता आणि आहे. हे इथे सिध्द होते.ज्या आनंदाने मातंग समाजाने गावकीचे जबाबदारी स्वीकारली म्हणजे मनुस्मृती ने लादलेले नियम स्वीकारले आणि हिंदू धर्मातील राम जो असेतू हिमाचल अवतराचा एक अवतार आहे असे भासवून संपूर्ण देशातील वेगवेगळे देव केवळ विष्णूच्या अवतराशी मिळवले गेलेले मातंग समाजाने ते स्वीकारले तेव्हा पासूनच ही म्हण पडली असावी की, जय भीम पेक्षा राम राम बरा.!!!

अश्या प्रकारे मातंग समाजाने हिंदू धर्मातील मनुस्मृतीचे नियम स्वतः वर लादून घेतले आणि ते कायम सामाजिक सांस्कृतिक धार्मिक बंधनात अडकून बसले. कारण प्रस्थापित व्यवस्थेला सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि राजकीय गुलामगिरी साठी एक अस्पृश्य समाजातील मोठा वर्ग पाहिजे होता जो धर्माच्या नावाने आज्ञाधारी गुलाम होईल आणि राजकीय चळवळ कमकुवत करण्यास पर्यायाने अस्पृश्य समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यास मदत करील.असा आयता वर्ग मातंग समाजाने शासक लोकांना उपलब्ध करून दिला आहे.

महारांनाच आरक्षणाचा लाभ हे आभासी वास्तव

म्हणतात ना की लाकडाचा दांडा कुळास घात. इथेच शासक लोकांनी मातंग समाजाला जवळ केल कारण.जय भीम पेक्षा राम राम बरा.!!! पण मातांगतील काही हे बाबासाहेबांनी दिलेले मूलमंत्र शिक्षण घेऊन बाहेर पडले सोबतच बंधुत्वाची जबाबदारी घेऊन चलो बुद्ध की ओर हे अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करू लागले त्यापैकी एक बुद्धवासी जी.एस.दादा कांबळे, पारवे गुरुजी प्रा.मारुती कसाब इत्यादी. शासक लोकांनी येऊ घातलेला धोका ओळखून लगेच आरक्षणाचे वर्गीकरण नावाचे भूत लगेच द्वेष्टय  मांग लोकांच्या मनात भरवल्या आणि परत एकदा दुही निर्माण करण्याचे काम सुरू झाले. बरं अनुसूचित जाती मध्ये एकूण 59 अस्पृश्य जाती आहेत. पण केवळ महार लोकांनी मांग लोकांचे सर्व हक्क अधिकार या आरक्षणातून पळवले याची आभासी प्रतिमा तयार करण्यात आली.

केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर

अगोदरच मुख्य  प्रवाहापासून दूर असलेला मातंग समाज आणि द्वेष्टे यांनी याचा उहापोह केला.आणि वर्गीकरण लढा चालू केला.आता त्या बाकी राहिलेल्या 57 जाती त्या कधीच महार समाजाच्या विरोधात तक्रार करीत नाहीत. परंतु गावकीचा आणि भावकिचा हेवा असलेल्या मातंग समाजाला आरक्षण वर्गीकरण तेही ८ टक्के पाहिजेत तेही १३ टक्क्यामधून कारण मनावर असे बिंबवले गेले आहे शासक लोकांनी की महार च तुमचं हक्क अधिकार हिसकावून घेतात बाकी ५७ जातीला काही मिळो अथवा न मिळो पण ८ टक्के आरक्षण पाहिजेत मांग समाजातील द्वेष्टे यांना.शासक लोकांना माहिती आहे की जय भीम पेक्षा राम राम बरा!!! म्हणून राजकीय स्वार्था साठी जवळ केलेला अस्पृश्य वर्गातील मांग हा अजूनही हिंदू अडगळीत पडलेला आहे.

महार मांग वाद पेटवण्यासाठी वर्गीकरण

राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून विधान सभा,लोकसभेवर निवडून गेलेले मांग जातीचे आमदार खासदार हे कधीच सभागृहात मांग जातीच्या मागासलेपणाच बोलत नाहीत की मांग आयोगाच्या शिफारसी लागू करा म्हणून काहीच भूमिका घेत नाहीत.परंतु महार – मांग वाद पेटवण्यासाठी वर्गीकरण मात्र हवे आहे असे समाजात जाऊन सांगताना पाहण्यास येतील कारण फोडा नि राज्य करा हीच निती मागील शतकानुशतके इथली प्रस्थापित शासक लोकांनी अवलंबिली आहे त्याचे हस्तक म्हणून मांग द्वेष्टे काम करत आहेत यात शंकाच नाही. पण बाबासाहेबांनी सर्व ५९ जातीला एका अनुसूचित संवर्गात बसवून राष्ट्रीय स्तरावर बंधुभाव निर्माण केला आहे त्याला छेद देण्यासाठी शासक वर्ग कायम प्रयत्न करीत आहे हे मात्र मांग विसरत चालले आहेत यात शंकाच नाही.

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र काही केवळ महारांची मक्तेदारी नसून संपूर्ण ६७४२ जाती ज्या अनुसूचित जाती जमाती,भटके विमुक्त,ओबीसी इतर मागासवर्गयांसाठी दिलेल्या सांविधनिक हक्क अधिकार यांच्या संरक्षणासाठी दिलेला आहे हे विसरता कामा नये.

महार लोकांनी केल्या अन्यायाविरुद्ध जसा आवाज राज्यभर माध्यमांच्या द्वारे आजुन महार मांग दूही निर्माण करण्यासाठी वापरलाय तसा कधीच सवर्ण लोकांनी केलेल्या अन्यायाविरुध्द झाला नाही याचा तोडच नाही.म्हणून असे वाटत असावे की जय भीम पेक्षा राम राम बरा.!!!!

ॲड.शिरीष कांबळे

उच्च न्यायालय खंडपीठ,
औरंगाबाद.
९६७३४१७३०४

आपलं सरकार

Click to listen highlighted text!