Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : भीषण अपघात : लग्नसमारंभ आटोपून गावाकडे परतणा-या व-हाडावर काळाचा घाला, ६ ठार, १४ जखमी

Spread the love

सिल्लोड तालूक्यातील मंगरूळ गावावर शोककळा

सिल्लोड : लग्नसमारंभ अटोपून गावाकडे परतणा-या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची घटना गुरूवारी (दि.३०) पहाटे २ वाजेच्या सुमारास सिल्लोड ते भराडी रस्त्यावरील मोढा फाट्यावर घडला. या भिषण अपघातात पीकअर टेम्पो रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठलागून जावून आदळला. यामध्ये पीकअप ट्रकमधील सहा जण जागीच ठार झाले असून १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात ठार झालेल्यांची नावे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १. जिजाबाई गणपत खेळवणे (वय ६०), २. संजय संपत खेळवणे (वय ४२), ३. संगीता रतन खेळवणे (वय ३५), ४. लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (वय ४५), ५. अशोक संपत खेळवणे (वय ५२) , ६. रंजनाबाई संजय खेळवणे (वय ४०) सर्व रा.मंगरूळ, ता.सिल्लोड असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

जखमींची नावे

तर १. कासाबाई भास्कर खेळवणे (वय ४०), २. अजिनाथ शेषराव खेळवणे (वय ४५), ३. आकाश रमेश बोर्डे (वय १८), ४. ऋषिकेश गोविंदराव आरके (वय २०), ५. संतोष गणपत खेळवणे (वय३०), ६. धुलाबाई नारायण बोर्डे (वय ५०), ७. दुर्गाबाई दत्तात्रय खेळवणे (वय ४५), ८. सुलोचना आत्माराम खेळवणे (वय ५५), ९. गणेश सुखदेव बोर्डे (वय १९),१०.  सार्थक अजिनाथ खेळवणे (वय ८), ११. ओमकार रतन खेळवणे (वय १६), १२. कलाबाई बाबू म्हस्के (वय ५०), १३. सुभाष राजेश खेळवणे (वय ४५), १४. सुरेश विठल खेळवणे (वय ५०) सर्व रा.मंगरूळ, ता.सिल्लोड असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पिकअप व्हॅन चे झाले दोन तुकडे

मंगरूळ शिवराम मुकुंद  खेळवणे याचा बुधवारी सायंकाळी घाटशेंद्रा येथे विवाह असल्याने खेळवणे कुटुंबिय घाटशेंद्रा येथे पिकअप  ट्रक क्रमांक (एमएच-२०-सीटी-२९८१) मधून  गेले होते. लग्नसमारंभ अटोपल्यानंतर व-हाडी मंडळी घाटशेंद्रा येथून मंगरूळ गावाकडे परतत असतांना रस्त्याच्या कडेला ऊस भरून नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर ला जाऊन पीकअप ट्रक धडकला.अपघात इतका भीषण होता की पिकअप चे दोन तुकडे झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, फौजदार विकास आढे, लक्ष्मण कीर्तने, अनंत जोशी व कर्मचा-यानी घटनास्थळी धाव घेतली लोकांच्या मदतीने जखमी व मृतांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापैकी गंभीर जखमी असलेल्या ९ जणांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तर उर्वरित पाच जणांना सिल्लोडच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!