Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : गुन्हेशाखेच्या दोन कारवाया, मालेगावहून शहरात चरस, वकीलासहित ८ अटक

Spread the love

औरंगाबाद : काल रात्री २४ आॅक्टोबर रोजी रात्री ११.३० वा.बजरंगचौक सिडको परिसरात चरस चिलीममधे भरुन ओढतांना धर्मगुरुच्या पुत्रासह,एक वकील व दोन व्यावसायिक व विक्रेत्याला गुन्हे शाखेने अटक केली.त्यांच्या ताब्यातून २लाख रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शहरात चरस मालेगावातून येत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे.

याप्रकरणी अटक आरोपी मधे सय्यद नजीरोद्दीन सय्यद रियाजोद्दीन(२९) (चरस विक्रेता) साजिद अब्दुल करिम अन्वर(३८) दोघेही रा.कटकटगेट, अॅड.सोहेलखान शकील खान (३३) रा.रशिदपुरा,नाथन प्रभाकर पाटील (३१) रा.चिकलठाणा व शेख जफर नूर मोहंमद(३७) सिडको यांचा समावेश आहे.तसेच स.नजीरोद्दीन ला चरस पुरवठा करणारे नासिरखान बशीरखान रा आलमगीर काॅलनी, अल्ताफखान आरेफखान रा.रशिदपुरा वरील आरोपी मालेगावहून चरस शहरात आणून गेल्या अनेकवर्षापासून पुरवठा करंत असल्याचे रशीदपुर्‍यातील रहिवाश्यांनी पोलिसांना सांगितले.त्यादृष्टीने पुढील तपास करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

एमपीडीए मधून बाहेर येताच सक्रिय झालेल्या झगल्या सक्रिय

एक महिन्यापूर्वी एमपीडीएच्या शिक्षेतून बाहेर येताच झगल्या उर्फ रमेश चव्हाण ने नवी टीम तयार करुन मोटारसायकलस्वाराला लूटमार केल्याप्रकरणी गुन्हेशाखेने एकाला अटक केली आहे.व सिडको औद्योगिक पोलिसांच्या हवाली केले.राहूल जाधव रा.ॠषीकेशनगर चिकलठाणा असे अटक आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात गुन्हेशाखेने आरोपी अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीत त्याच्या सोबंत रेकाॅर्डवरचे तिघे या गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.ज्यामधे पुढील आरोपींचा समावेश आहे. झगल्या उर्फ रमेश चव्हाण याच्यावर १५दरोड्याचे गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यात दाखल आहे. राहूल जाधव याचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.तर आश्विन शिवदास कुरणे,कृष्णा इन्या पवार हे सुध्दा रेकाॅर्डवरचे आहेत.

वरील चौघांनी २३आॅक्टोबर रोजी रात्री ११.३०वा. जालनारोडवरील सानिया मोटर्स समोर चिकलठाण्याकडे मोटरसायकलवर जाणारे मनोज पडेवाल(३४) यांना मारहाण करंत लूटले.त्यांच्याजवळील साडेतीन हजार रु.व मोबाईल हिसकावला. या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
वरील कारवाई पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता,पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव,एपीआय मनोज शिंदे,पीएसआय दत्ता शेळके,पवन इंगळे,पोलिस कर्मचारी किरण गावंडे, संजय राजपूत, नितीन देशमुख,गजानन मांटे यांनी पार पाडल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!