AurangabadCrimeUpdate : कारागृह रक्षकाला लुबाडणार्‍या तिघांना गुन्हेशाखेकडून अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – अण्णाभाऊ साठे महामंडळात कंत्राटी कामगार म्हणून काम करणार्‍या महिला कर्मचार्‍याने रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारांना हाताशी धरुन कारागृह रक्षकाचा भूखंड व २लाख रु लुबाडला. या प्रकरणी तिघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.एक जण फरार आहे. शितल चव्हाण, शेख जावेद उर्फ टिप्या, अर्जून पाटील,दिपक पाटील अशी आरोपींची नावे आहेत.यातील शेख जावेद उर्फ टिप्या फरार आहे.तर उर्वरित तिघांना गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या.

Advertisements

कारागृह रक्षक सतीश उबरहंडे असे फिर्यादीचे नाव असून ते लातूर येथे नौकरी करतात. उबरहांडे हर्सूल कारागृहामधे नौकरीला असतांना तिथे टिप्याही शिक्षा भोगंत होता.त्यामुळे उबरहांडे टिप्याला ओळखतात.दरम्यान अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून पत्नीच्या नावे १५लाख रु.लघू उद्योगासाठी कर्ज प्रकरण आरोपी शितल चव्हाण च्या मार्फत दाखल केले होते.कर्ज घेतांना औरंगाबाद परिसरात असलेला भूखंड गहाण ठेवण्याच्या प्रक्रियेत आरोपी शितल चव्हाण हिचे ४लाख ४०हजार रु.खर्च झाल्याची माहिती सतीश उबरहंडे यांना दिली.म्हणून उबरहंडेने २लाख रु.शितल चव्हाण ला दिले.पण उर्वरित पैशे मिळवण्यासाठी शितल चव्हाण ने कर्ज मंजूरी साठी उबरहंडे चा भूखंड फेरफार करण्यासाठी उबरहंडेला औरंगाबादला बोलावले.१८सप्टेंबर रोजी शितल चव्हाण ने रेकाॅर्डवरचे गून्हेगार टिप्या उर्फ शेख जावेद, अर्जून पाटील, दिपक पाटील यांना सोबंत घेऊन सिडको एन१येथील क्रेझीबाईट हाॅटेलवर बोलावून कार मधे डांबले.व हायकोर्ट परिसरात नेत उबरहांडे यांचा औरंगाबाद लगतच्या भूखंडाची नोटरी शितल चव्हाण च्या नावे केली.व उबरहांडे जवळील २०हजार रु.हिसकावून त्यांना सोडून दिले.या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात २३सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला.दरम्यान गुन्हेशाखेला वरील प्रकरण घडल्याचे कळाले होते.

Advertisements
Advertisements

पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी तपासाची चक्रे फिरवत पीएसआय दत्ता शेळके यांना कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार वरील तीन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून गून्ह्यात वापरलेली कार,मोबाईल,व ५हजार रु.जप्त केले.वरील कारवाईत पोलिसउपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली गून्हेशाखेने सहभाग नोंदवला.पोलिस कर्मचारी गजानन सोनटक्के, नंदकुमार भंडारे,धर्मराज गायकवाड, नितीन धुळे, नितीन देशमुख यांनी कारवाई पार पाडली.पुढुल तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नागरे करंत आहेत.

आपलं सरकार