Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : गुजरात विधानसभेची एमआयएमकडून तयारी , ओवैसी यांची काँग्रेस आणि भाजपवर टीका

Spread the love

अहमदाबाद : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम पूर्ण ताकदिनिशी उतरणार असल्याची घोषणा ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. अर्थात गुजरातमध्ये नेमक्या किती जागांवर निवडणुका लढवणार याचा निर्णय पक्षाचं गुजरात युनिट घेईल,असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले आहे. ओवैसी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

यावेळी बोलताना ओवैसी म्हणाले कि, १९८४ नंतर गुजरातनंतर कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही. यावेळी ओवैसी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले कि , राहुल गांधी यांनी आपला पारंपरिक मतदारसंघही गमावला. तिथे आमच्याकडे उमेदवार उपलब्ध नव्हता. वायनाडमध्ये ३५ टक्के मतदार अल्पसंख्यांक असल्यानेच काँग्रेसला हा मतदारसंघ जिंकता आला. त्यामुळे आम्हाला पाहताच ए टीम, बी टी, वोट कटर अशी नावं देणं सुरू करतात. परंतु, आता लोकच निर्णय घेतील.

तुम्ही मुस्लीम मतदारांमुळे हरला असाल किंवा गैर मुस्लीम मतदारांमुळे पराभव झाला असेल पण खरे कारण आहे असे कि , काँग्रेसचे लोक भाजपमध्ये सहभागी झाले ही काही आमची जबाबदारी असू शकत नाही. काँग्रेसने माझ्यावर कितीही आरोप केले तरी मला त्याचा काहीही फरक पडत नाही.

दरम्यान उत्तर प्रदेशात गेल्या तीन वर्षांत एकाही मुस्लीम व्यक्तीला घर मिळालेलं नाही. यूपीत आतापर्यंत हजारांहून अधिक धार्मिक दंगली उसळल्या आहेत. तसेच राज्यात भाजपच्या ३७ आमदरांविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, असे म्हणत ओवैसी यांनी राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!