CoronaWorldNewsUpdate : शाळा उघडणे पडले महागात , अमेरिकेत एकाच आठवड्यात अडीच लाख मुलांना कोरोनाची लागण !!

Advertisements
Advertisements
Spread the love

वॉशिंग्टन : जगात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नसताना शाळा सुरु करण्याचा निर्णय अमेरिकेला चांगलाच महागात पडला असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेतील अडीच लाख मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आहे. दरम्यान गेल्या महिनाभरात साडेसात लाख अमेरिकन मुले कोरोनाबाधित आढळले आहेत.

Advertisements

या संदर्भात अमेरिकन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या अहवालानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अडीच लाखांपेक्षा जास्त मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून मुलांच्या उपचाराचा एका आठवड्यातील हा सर्वोच्च आकडा आहे. मागच्या आठवड्यापेक्षा यामध्ये १० टक्के वाढ झाली आहे. अमेरिकेत या आठभरात एकूण दहा लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी मुलांची संख्या ही २५ टक्के आहे.

Advertisements
Advertisements

कोरोनाग्रस्त मुलांची संख्या वाढल्याने  हॉस्पिटलमध्ये ताण वाढू लागला आहे. अमेरिकेतील यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेन्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ऑगस्ट ते २ सप्टेंबरच्या दरम्यान साडे सात लाख मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या अहवालानुसार अमेरिकेतील ५० लाख मुलांना आजवर कोरोनाची लागण झाली असून यापैकी ४४४ जणांचा मृत्यू झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण पाच पट वाढले आहे, असे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. जून ते ऑगस्ट या महिन्याच्या काळात चार वर्षांपेक्षा कमी वय आणि १२ ते वयोगटातील मुलांचे प्रमाण हे १० पटीने जास्त आहे, अशी माहिती या रिपोर्टमधून स्पष्ट झाली आहे.

आपलं सरकार