Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी मोदी -शहांच्या राजीनाम्याची मागणी

Spread the love

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर उघडकीस आलेल्या पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून मोदी सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही घेरले आहे. शुक्रवारी संसद परिसरात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही आपला फोन टॅप करण्यात आल्याचा दावा केला आहे. हा केवळ आपल्या खासगी आयुष्याच प्रश्न नाही तर हे जनतेच्या आवाजावर आक्रमण आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.


या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही या प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. पेगॅसस हे एक हत्यार आहे. इस्रायल सरकारकडून याला हत्यार समजले जाते. हे हत्यार दहशतवादी आणि गुन्हेगारांविरुद्ध वापरले जाते. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी  या  हत्याराचा वापर  देशातील संस्था आणि लोकशाही विरोधात केला आहे. माझा फोन टॅप करण्यात आला. हा केवळ माझ्या खासगी आयुष्याचा प्रश्न नाही तर हे जनतेच्या आवाजावर आक्रमण आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राफेलची चौकशी रोखण्यासाठी पेगॅससचा वापर करण्यात आला. गृहमंत्र्यांनी राजीनामा सादर करायल हवा आणि नरेंद्र मोदी यांची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी. याचे  कारण पेगॅससच्या वापराला अधिकृत स्वीकृती केवळ पंतप्रधान आणि गृहमंत्रीच देऊ शकतात, असंही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

न्यायालयीन चौकशीची मागणी

अनिल अंबानी यांचा फोन टॅप झाला हा प्रश्न नाही… तर प्रश्न हा आहे की जेव्हा सीबीआय एफआयआर दाखल करणार होती त्यापूर्वीच सीबीआय संचालक आलोक वर्मा यांचा फोन टॅप करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी करत राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी संसद परिसरात आंदोलनही केले. यावेळी, काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाळ, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी तसंच काँग्रेसचे अनेक खासदार उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!