लोकसभेत पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधक आक्रमक

Advertisements
Advertisements
Spread the love

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करायला उठताच विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. महागाईच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले दरम्यान त्यांनी जोरदार घोषणाबाजी ही केली. काँग्रेस खासदारांनी लोकसभेत महागाईचा मुद्दा लावून धरला आणि बसपाचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

Advertisements

पंतप्रधान म्हणाले की, मला वाटले की आज उत्साहाचा दिवस असेल परंतु विरोधी पक्ष दलित, महिला आणि ओबीसी लोक मंत्री बनवण्याच्या चर्चा पचवित नाहीत. मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मंत्रीमंडळाची ओळख करून देत असताना ही टीका केली. हा गोंधळ पाहून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोरोनादरम्यान मृत्यू पावलेल्या खासदारांविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. तसेच विरोधकांच्या गदारोळानंतर बिर्ला यांनी हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला.

Advertisements
Advertisements

दरम्यान, पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतींचा निषेध व्यक्त करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार सायकलवरून संसदेत पोहोचले. विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणे योग्य नाही असे त्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले.

आपलं सरकार