Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : जाधववाडीतील हत्या प्रकरणातील मृताची ओळख पटली

Spread the love

औरंगाबाद : जाधववाडी भाजीमंडईत दगडाने ठेचून एकाची हत्या केल्याची घटना २१ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली होती. मात्र, दिवसभर त्याची ओळख पटू शकली नव्हती. शनिवारी सकाळी एकाने माहिती दिल्यामुळे त्या मृताची ओळख पटली आहे. दादाराव सांडू सोनवणे (४५, रा. खेरवाडी, जाधववाडी) असे मृताचे नाव आहे. दारुच्या वादातून दादाराव यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जाधववाडी भाजीमंडईतील मुख्य संकुला समोरील शॉपींग सेंटरच्या गच्चीवर लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला दादाराव यांचा मृतदेह दिसून आला होता. त्यावेळी दादाराव यांची ओळख पटली नव्हती. दादाराव यांचा सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून खून केल्याची माहिती मिळताच सिडको पोलिसांसह गुन्हे शाखा, फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकाने धाव घेतली होती. त्यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ सिमेंटचा तुटलेला गट्टू, खिचडीचे पाकीट, रुमाल, मास्क, खिशात दोन नशेच्या गोळ्या, चिल्लर पैसे आणि बाजूला गाठोड्यात एक ड्रेस, रुमाल आढळून आला होता.

दरम्यान, मध्यरात्रीनंतर दादाराव यांची ओळख पटली. आज सकाळी सोनवणे कुटुंबिय घाटीत दाखल झाले. दुपारनंतर दादाराव यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह अंत्यविधीसाठी सोनवणे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, मारेक-यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे. दादाराव यांचा मुलगा एमजीएम रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये कामाला असून, त्यांची मुलगी बारावीचे शिक्षण घेत आहे. तर दादाराव हे टेलरिंगचे काम करत होते. त्यांना मद्यपानाचे अती व्यसन होते अशी माहिती सोनवणे कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!