Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : रेमेडीसीवीर इंजेक्शनच्या एमआरपीत अखेर झाली कपात, काळाबाजार करणारांना पोलिसांचा हिसका

Spread the love

पुरुषोत्तम सोमानी यांच्या प्रयत्नांना यश


औरंगाबाद : दि निजामबाद चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम सोमानी यांच्या अथक प्रयत्नांमुळे covid-19 साठी संजीवनी ठरलेले औषध रेमेडीसीवीर इंजेक्शनची एमआरपी कमी करण्याचे आदेश नॅशनल फार्मासिटिकल प्राईसिंगअथोरिटीनी रेमेडीसीवीर मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे रेमेडी सिवर इंजेक्शनची किंमत 900 ते3500 पर्यंत खाली आलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेमेडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात चालू असून गरजू रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. यावरून औषधांच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र शासनाशी सातत्याने पत्रव्यवहार करणारे पुरूषोत्तम सोमाणी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती त्यानुसार दि . १५ एप्रिल रोजी रेमेडीसीवीर इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांना एमआरपी तत्काळ कमी करण्याचे निर्देश दिले होते त्यावरून नॅशनल फार्मासिटिकल प्राईसिंगअथोरिटीने दिलेल्या माहितीनुसार रेमेडीसीवीर इंजेक्शन तयार करणाऱ्या ७ कंपन्यांनी आपली एमआरपी किंमत कमी केली आहे.


या कंपन्या आणि त्यांनी कमी केलेली एमआरपी पुढील प्रमाणे आहे. प्रारंभी आधीची किंमत
1. Cadila । 2800 | 899
2. Syngene । 3950 । 2450
3. Dr. Reddy । 5400 । 2700
4. Cipla । 4000 । 3000
5. Mylan । 4800 । 3400
6. Jubilant । 4700 । 3400
7. Hetero । 5400 । 3490


राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शनसाठी भटकंती करीत असतानाच त्याचा गैरफायदा घेत या इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच आहे. औरंगाबाद व नागपूरमध्ये शुक्रवारी पोलिसांनी काळाबाजार करणारी टोळी पकडली. नागपूरमधून डॉक्टरसह चौघांना अटक केली तर औरंगाबादमध्ये तिघांना अटक केली.

नागपुरात डॉक्टरलाच अटक 

नागपूर पोलिसांना कामठीमध्ये आशा हॉस्पिटलचे डॉ. लोकेश साहू यांच्याकडे १६ हजार रुपयांत एक रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डमी ग्राहकाच्या माध्यमातून इंजेक्शनची डिलिव्हरी करताना पोलिसांनी डॉ. साहू याला अटक केली. त्याची चौकशी केल्यावर प्रतापनगर येथील स्वस्थम हॉस्पिटलमधील दोन वॉर्डबॉयजवळ रेमडेसिविर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या वॉर्डबॉयनासुद्धा रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ७ इंजेक्शन जप्त करण्यात आली. त्यांची कसून चौकशी करीत असताना हिंगणा येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये एक वॉर्डबॉय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा खुलासा झाला. पोलिसांनी  मेघे हॉस्पिटलच्या त्या वॉर्डबॉयला सुद्धा ताब्यात घेतले.

औरंगाबादेत कर्मचाऱ्यासह तिघांना अटक

औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी रेमडीसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड केली. यामध्ये जिल्हा रुग्णालय (मिनी घाटी) येथील एक कर्मचारी आणि दोन औषधविक्रेते अशा तिघांचा समावेश आहे. या टोळीकडे तीन इंजेक्शन सापडले असून, यामधील दोन इंजेक्शन घाटी रुग्णालयातील आहेत तर एक इंजेक्शन बीड येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले.

आरोपींमध्ये ओमप्रकाश बोहते हा जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि मंदार अनंत भालेराव व अभिजित नामदेव तौर या दोन औषध विक्रेत्यांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी झाल्याचे वृत्त लोकमतने १४ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. या प्रकारानंतर वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणाही जागी झाली.

रुग्णांना इंजेक्शन लावण्यात येत नाही

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार रॅकेटमध्ये डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. कोरोना वार्डात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. याचा फायदा घेत कर्मचारी रेमडेसिविरची चोरी करतात. ज्या रुग्णाच्या नावावर इंजेक्शन मागविण्यात येते, त्याला लावण्यात येत नाही. इंजेक्शनची काळाबाजारी करून त्याला १० ते २० हजारात विक्री करतात.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!