Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Digital_भीमजयंती_2021 : अविस्मरणीय जयंती । मला आवडलेले बाबासाहेबांचे ज्वलंत विचार…

Spread the love

!! अविस्मरणीय जयंती !!


  • सुरेशदादा गायकवाड 

मौ. कोपरा हे किनवट तालुक्यातील घनदाट जंगलातील गांव.या गांवचे दिगंबरराव कावळे यांच कुटूंब व्यापाराच्या निमीत्ताने किनवट येथे स्थाईक झालेलं.त्यांचा लहान भाऊ गौतम कावळे यांने कापड मार्केट लाईन किनवट या रोड वर पंचशील टेलर्स या नांवाने फर्म सुरू केली होती.फर्म च्या ऊदघाटन समारंभास पॅन्थर्स ऊपस्थित होते. त्या फर्म वर मी,राम भरणे, नितीन कावळे यांची बैठक व ये जा नियमीत असे.गौतम व त्याचा पुतण्या यशवंत या दोघांची आमची मैत्री जमलेली. गोकुंदा किनवट येथे अनंतराव काळे फाॅरेस्ट खात्यातील कर्मचारी स्थाईक होते.त्यांचे दोन भाऊ वामनराव काळे आणि प्रभाकर काळे किनवट येथेच असल्याने माझा त्यांचेशी दोस्ताना झाला.त्या मुळे अनंतराव आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखून  होते.


अशा पार्श्वभूमीवर दिगंबरराव कावळे,मल्लु कावळे,गौतम कावळे यांच्याशी घनिष्ठ संबध जुळून आले.15ऑगष्ट 1977हा दिवस काळा स्वातंत्य दिवस म्हणून  साजरा करण्याचा निर्णय पँथरने  घेतला. कालवश प्रा.प्रतापचंद्र धन्वे आणि आर.जे.कांबळे मुख्याध्यापक मार्गदर्शक होते.पंचशील टेलर्स कडे पाच सहा झेंडे शिवले.पोलीसांनी फर्म वर धाड मारली हे समजताच धन्वे सरांच्या घरातून  झेंडे काढून नितीन कावळे यांच्या बैलाच्या गोठ्यात लपवून ठेवले.पोलीसांनी आम्हा सर्वांची झडती घेतली. पँथर अध्यक्ष दादाराव कयापाक यांना पोलीस भेटले.झेंडे फडकवणार नसल्याची खात्री करून पोलीस निघून  गेले.15 ऑगष्ट 1977 सालीच्या मध्यरात्री झेंडे लावून आम्ही सर्व पसार झालो. सिध्दार्थ नगरात काळे झेंडे लावल्या गेल्याची खबर पोलीसांना लागली.त्यांची एकच धावपळ.या सर्व प्रकाराने किनवटपँथर च्या हिम्मंतीची एकच चर्चा दुरवर पसरली.त्या नंतर नामांतर मागणी मोर्चा,नामांतर विरोधी दंगल या मुळे तालुक्यात पॅन्थरच्या झंझावाताचीच चर्चा झाली अन् आम्ही कार्यकर्ते ब-या पैकी लोकांच्या नजरेत भरलो.

बहुतेक 1979 ची भिम जयंती असेल.मौजे कोपरा येथे पँथर च्या पदाधिका-यांना रात्रीच्या सभेसाठी निमंत्रीत करण्यात आले.तेथील जयंती मंडळाचे पदाधिकारी जयवंतराव कावळे, दिगंबरराव कावळे यांचा आग्रह फार होता.सभे नंतर गान सम्राज्ञी करूणा वाघमारे यांच्या गायनाचा कार्यक्रम होता.

मौ. कोपरा येथील सभे साठी जाण्यासाठी मी स्वतः,राम भरणे,शाहीर आत्माराम साळवे,कालवश रघुनाथ कावळे आणि ईतर पॅन्थर त्यांची नांवे आता आठवत नाहीत असे आम्ही टॅक्सी सायकलने निघालो.आम्हाला शनिवार पेठ च्या घनदाट जंगलातुन मार्ग होता.त्या मार्गावर चकवा चौक होता.त्या चौकात हमखास नविन व्यक्ती चकवा खात असे.जंगलात अस्वल,बिबट्या वाघासह सर्वच हिंस्र प्राणि वास्तव्यात होते.गौतम कावळे सोबत असल्याने चकवा चौकाची भिती नव्हती.शिवाय आम्हाला कोणताही हिंस्र प्राणि नजरेला पडला नाही.असा कठीण प्रवास करून एकदाचे आम्ही मौ. कोपरा येथे पोहचलो एकदाचे.नेमकीच गांवाच्या प्रमुख मार्गा वरून मिरवणुक निघून विसर्जीत झाली होती. तेवढ्यात आम्ही पोहचलो.

सभेची तयारी झाली. सभेत सर्व वक्त्यांची व्यवस्थीत भाषणे पार पडली.गायनाचा कार्यक्रम सुरू झाला.पाच सहा गाण्या नंतर गावातील एका मातब्बर माणसाने लावणी सादर करण्याची फर्माईश केली अन् कुजबुज सुरू झाली. स्थानिक आयोजका पैकी एक दोघांचे लावणी गांवावी असे मत पडले तर बाकी सर्व विरोधात होते.गायकानी फर्माईशचे पैसे घेतले पण फर्माईश पुर्ण केली नसल्याचे लक्षात येताच त्या मातब्बर माणसाने व त्याच्या साथीदारांने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्याचे रूपातंर अर्वाच्च भाषेतून  शिवीगाळ व पिदाड्यांचा हैदोस सुरू झाला.कांही वेळा नंतर दगडफेक सुरू झाली आम्ही सर्व एका झोपडीत बसलेलो.स्टेजवर दगड भिरकावल्याने जयंतीतील जमावही सैरभैर झाला जेथे आश्रय मिळाला तेथे जमावतील लोक दडून बसले.परिस्थितीचा अंदाज कांही पण येत नव्हता. फक्त पेट्रोमॅक्स आहे त्या अवस्थेत डिम होऊन जळत होत्या तर स्टेजवर एक लाईटचा गोळा,आडव्या लाकडाला बांधलेला माईक एवढेच काय ते दिसत होते.अशा परिस्थितीत शाहीर आत्माराम साळवे आम्हाला चुकवून स्टेजवर गेले आणि माईकवर गर्जना केली की, कोई माई का लाल है तो पत्थर फेकने के बजाए मैदान में आव खंजर से एक एक को फाड दुंगा ये पॅन्थर की ललकार है!

तेवढ्या रात्री जमाव हातात काठी लाठी घेऊन बौध्द वस्तीवर चालून  आला.आरडा ओरडा, बायका पोरं आवाजाचे घमासान कांहीच कळत नव्हते.बौध्द वाड्यातील कांही मंडळी पुढे होऊन गांवक-यांना बोलायला गेली थोड्या वेळाने आक्रमक झालेला जमाव शांत झाला.अशा अशांत वातावरणात कधी रात्र गेली समजले नाही. सुर्योदया नंतर वातावरण अधिकच तापले आम्हाला गावक-यांच्या हवाली करा अशी दांडगाई सुरू झाली.अनंतराव काळे या बिटचे जमादार होते त्यांनी आणि दिगंबरराव कावळे, जयवंत कावळे यांनी मध्यस्ती कली.सकाळक अकराच्या सुमारास आम्ही आणि भजनी मंडळ कोपरा गांवाच्या बाहेर पडलो.

किनवटला येऊन स्थिरस्थावर झाल्या नंतर दादाराव कयापाक यांच्या वाड्यात आम्ही सर्व पॅन्थरनी परिस्थितीवर चर्चा केली.

कोपरा येथील जयंतीच्या कार्यक्रमात गोंधळ कुणी कुणी घातला त्याची माहीती जयवंत कावळे, दिगंबरराव कावळे यांच्या कडून घेतली त्या वेळी आम्हाला समजले की, कोपरा गांवचे बडे प्रस्थ कानबाराव पाटील यांच्या मुलाने फर्माईश वरून जाणुन बुजून गोंधळ केला.कानबाराव पाटील शभंर एकर जमीनीचे मालक फार मोठी असामी.त्यांचा 52दरवाज्याचा वाडा.त्या वाड्याचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याला कुलूप लावत नसत. 52 दरवाज्या पैकी कोणत्याही एका दरवाजाने प्रवेश केला तर त्याच दरवाजाने परत होता यायचे. कानबा पाटलाच्या बैठकीतच तमाशाची सोय.त्यानी त्यांच्या मुलाच्या लग्नात स्टील चे ताट वाटीत जेवण दिले. ताट वाटी पगंतीत एकदाच एका व्यक्ती साठी वापरली गेली.दुस-या दिवशी सर्व ताटवाटीचे दान त्यांनी केले केवढी मोठी श्रीमंती.एवढ्या मोठ्या धनाड्य माणसाच्या मुलाचा बंदोबस्त करायचा.जयंतीत गोंधळ माजवला त्याची परतफेड करायची असे ठामपणे ठरले.

जिल्हा परिषदेत च्या प्राथमीक आरोग्य केंद्रात जि एस व्यवहारे साहेब औषधी मिश्रक या पदावर कार्यरत होते. माझे त्यांच्या कडे दररोज जाणे येणे होते.आताचे जि.प.प्रसिध्दी अधिकारी मिलींद व्यवहारे यांचे वडील जि एस व्यवहारे होत.नेहमी प्रमाणे एके दिवशी मी त्यांच्या कडे गेलो असता त्यांनी मला सांगीतले की, कोपरा येथील कानबा पाटलाचा मुलगा दवाखान्यात आलाय.औषध घ्यायच्या चिठ्ठीवर त्यांचे असलेले नांव वाचून ते नांव व्यवहारे साहेबानी मला सांगीतले.मी त्याची विचारणा केली असता व्यवहारे साहेबानी सांगीतले की मोठ्या माणसाचा मुलगा असल्याने डाॅक्टर कामतीकर चहा पाणि करता आहेत.तेवढ्याच वेळाचा फायदा मी घेतला.सायकल काढली सिध्दार्थ नगर मध्ये आलो दादाराव कयापाक,सुरेंद्रसिंग, रघुनाथ कावळे, माधव कावळे, राम भरणे,प्रकाश नगराळे सर्व एकत्रच भेटले.कानबा पाटलाचा मलगा आल्याचे मी त्यांना सांगताच सर्वानी धावा बोल केला.आम्ही सर्व दवाखान्याच्या गेट बाहेर पोचतोच तर पाटलाचा मुलगा आमच्या समोरून बाहेर पडत होता. कालवश रघुनाथ कावळेनी त्याचे नांव विचारताच तो गरबडला आणि मग काय संधी मिळेल त्यांनी त्याला खुप मारले. सुरेंद्रसिंग जवळ सायकल ची चैन होती सपासप वार.तेवढा मोठा धाडधिप्पाड पाटलाचा पोरं पॅन्थर च्या समोर जमीनीवर रक्तबंबाळ अवस्थेत ओरडत होता. वाचवा वाचवा वाचवा.आता त्याला वाचवणार कोण होतं. किनवट शहर पॅन्थर चा बाल्ले किल्ला होता.जवळ येण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. सुरेंद्रसिंग च्या माराने कपडे रक्त बंबाळ,रक्ताच्या चिळकांड्या बघून आम्ही पसार झालो.

पुढे पोलीस केस झाली.अटक पेशी नेमीचेच. अशा प्रकारा मुळे किनवट तालुक्यात हा हा कार माजला पॅन्थर ची प्रचंड दहशत बसली.लोक म्हणु लागले आता पॅन्थर आलंय निट वागा पहील्या सारखं वागायला जाल तर किनवट ला रट्टे रट्टे भेटतात. तिथं आपलं कोणी नाही.

तर कोपरा येथील पार पडलेली अविस्मरणीय जयंती मी कदापीही विसरू शकत नाही.होय मीच तो त्या पैकी एक पॅन्थर.जयभीम.


मला आवडलेल्या बाबासाहेबांच्या  विचारांची प्रेरणा

” मनुष्य चैनीची वस्तु नसून कर्तव्याची भूमिका  ” हे सुबक वचन चौथे. महानायक महामानव प्रज्ञासूर्य  बोधीसत्व संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाक्षिक पत्र ‘मूकनायक’चा अंक पहिला तारिख तीन एप्रिल 1927 प्रमाणे  बाबासाहेब नेहमी मानवी जीवनभर  कर्तव्याची भूमिकेत होते त्यांची चुणूक  त्यांच्या लेखनातून वागणयात बोलण्यात भाषणाच्या कलेत कामाच्या माध्यमातून जगाला दाखवली व जगात समता- न्याय- बंधूतेने वागण्यास  आणि सामाजिक जीवन  प्रस्थापित करण्यासाठी ते जगत होते आज ते मोठे विद्वान महामेरू ठरले असे  अनेक उच्च विचार आपल्या ज्ञानातून  माणसाला माणसात  आणण्यासाठी  प्रयत्नशिल होते. हिच प्रेरणा आपल्याला समाजिक जीवन  व्यतीत करण्यास आजही नवीन पिढीला लागू राहील बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे इतिहासात नवीन उर्जा देणारे अन्यायावर वाचा फोडून न्याय मिळवून देऊन क्रांतीकारक परिवर्तन घडवून देऊन संपुर्ण विश्वात बंधु भाव निर्माण करून  देईल.

मनुष्य जीवन  चैनीची वस्तु नाही हे तुम्हाला तरी मान्य आहे का? मला तर नाही. तुमचे  काय तुम्ही ठरवा आणि कर्तव्याची जाण जीवनात असणे म्हणजे शहाणपणाचे लक्षण आणि चैन करणे म्हणजे आपल्या स्वार्थ मतलबी, धूर्त मी पणा सोडून आपली जबाबदारी कर्तव्य सर्व मानव जीव,  पशू जीव श्रेष्ठी. पर्यावरण आपले आहे त्यांचे जतन पालन पोषण आपला धर्म स्वभाव बनवला पाहीजे असे त्यांच्या एका वाचनात आढळून आले .  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  जीवन  आणि लेख कादंबरी संग्रह म्हणजे महासागर होय. ज्या महामानवा समोर अरबी समुद्र नतमस्तक होतो. तेव्हा मी आणि आपण काय आहोत त्या महानायकाला त्याच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित आणि नेहमीच महामानवा समोर नतमस्तक होऊन  विनम्र अभिवादन करतो.

– प्रा.तुकाराम सिरसट


अविस्मरणीय असे काही…


” बाबांच्या लाडक्या मुलांनो…आणि “


आजच्या किमान 10 तालुक्यातील भिमजयंती उत्सव सोहळ्यात त्या काळी माझे बाबा ए.पी.भद्रे गुरुजी प्रमुख वक्ते,अध्यक्ष म्हणून महिनाभर दौरे करायचे. अनेक गावात जयंती सोहळे त्यांच्याच प्रेरणेने सुरु झालेले. त्यामुळे प्रत्येक जयंतीला बाबांना आग्र्हाचे निमंत्रण. एका दिवशी किमान 3 गावात पाहुणे. सोबत आयु,संतराम सोनकांबळे सर.

ह्या दोघांची जोडी म्हणजे चित्रपट भाषेत ” राम-लखन “… त्रिसरण पंचशील,प्रास्ताविक सोनकांबळे सर पार पाडायचे आणि मग बाबांचे तडाखेबंद,अप्रतिम भाषण, मग लगेच बैलगाडी,सायकल किंवा पायिच… लगेच दुसऱ्या  जयंतीला.

कारण, तेथील जनता डोळयात प्राण आणुन त्यांची वाट पहायची.

माझ्यात बाबांचे वक्तृत्वगुण उतरलेले ! त्यामुळे पहिली ते चौथी बाबांनी मला बाल वक्ता म्हणून अनेक गावी नेले.

सकाळी वक्ता, दुपारी मिरवणूकीत डान्सर आणि रात्री भजनात बाल गायक, अशा तिहेरी कार्यामुळे माझे

प्रचंड कौतुक व्हायचे. माय माउल्यांचे आशिर्वाद. माझ्यावर कौतुकाने हार आणि पैशांची उधळण वगैरे, पाचवीला गेलो. माझ्या नावाची मागणी वाढली.आणि बाबांनी मग जो तरुण कार्यकर्ता माझी मागणी केली तिथे पाठवायला सुरुवात केली.

लहान मुलगा आहे…तो कसा जाईल,काय खाईल ? अजिबात काळजी नाही..

बाबासाहेबांचे रुण फेडायला जातोय ना..बस्स.

त्या काळात आमच्या घरी घरातील,गावाकडच आणि सोबत गरीबांची किमान 4 मुले असे किमान दरवर्षी 2 रुममध्ये 20 लोक आनंदाने रहायचो…

त्यात देवीदास खंडागळे आटाळा ह्या गावचे आमच्या घरी शिकायला आलेले.

ते माझा खूप लाड करायचे…

त्यांनी मला बाबांना विचारुन आटाळा गावी नेले…मी सातवीला असेल.

गावी गेल्यावर त्यांच्या घरच्यांनी खूप लाड केला…गावच्या बाजुला गंगा…

भोपळे बांधून पोहण्याचा अयशस्वी प्रयत्नही झाला…

गंगेतील मासेही मनसोक्त खाल्ले.

दुसरा दिवस…

संध्याकाळ झाली.गावात भजने सुरु झाली..देवीदास अण्णा गावचे लाडके..

त्यानी माझ्या गायनाची किर्ती गावभर केलेली…

अचानक गावातील 2-3 हिंदू तरुण घरी आले आणि त्यांनी अण्णाला मला भजनात गाण्यासाठी येण्याचा आग्रह केला.

आम्ही गेलो…एका सावकाराच्या घरी भजन…बाहेर भोंगा बांधलेला…बाहेर किराणा दुकान…आत चौसोपी वाडा…तिथे भजन रंगलेले…

आधी भजन मग गवळणी ई…

सगळी हिंदू परंपरेतील गाणी…

वातावरण समतेचे नाही तर समरसतेचे !

दोन समाजातील माणसांचे बसण्या-उठण्यातिल अंतर त्या बाल वयातही काट्याप्रमाणे टोचणारे.

मग सगळ्यांचा आग्रह मला…

पण मला फक्त त्या काळी बुद्ध-भिम गिते आणि चित्रपट गितेच यायची…माझी टाळाटाळ…पण प्रसिद्द बालगायक म्हणून मला आग्रह…मी परेशान…काय गाऊ ?

बरे त्यात तिथे फक्त पेटी,टाळ आणि मृदंग.

तबला नाही,ढोलकी नाही,सहगायक नाहित.

मला कोरस कोण देणार ?

सगळे भाविक गायक म्हणाले ” आम्ही “…

मी मनातून सुर लावला …

सामाजिक जाणिव रक्तात.

त्यामुळे मी गाऊ लागलो

माझ्या आवडीचे गाणे…

” बाबांच्या लाडक्या मुलांनो,

घर हे सोडू नका,

भिमाची आज्ञा  मोडू नका…”

मी मनापासून  गातोय…मुखडा झाला..

आणि अचानक टाळ,मृदंगाचा गजर…

आणि मी गरगरलो…

कारण,त्या सर्वांचा मनापासून  कोरस

” पिकले जांभुळ तोडू नका

कुणी झाडावरती चढू नका…”

(अर्थात हे जाणुनबुजुन होते की चाल सारखी होती,त्या लोकांना मुळ गाणे माहित नव्हते म्हणून…

कदाचीत हेच सत्य.गाणे पडु नये म्हणून त्यांचा हा तोडका मोडका समान चालिचा कोरस त्यांनी ऐन वेळचे शस्त्र म्हणून वापरलाअसावा…काही कळाले नाही)

भेदरलेल्या अवस्थेत माझे गाणे संपले..

आणि त्या सर्व लोकांनी मला डोक्यावर घेतले…सावकारांनी 5 रु.तर इतर लोकांनी 1-1 रु. असे जवळपास 25 रु.बक्षिस दिले..

सोबत पार्ले बिस्किटाचे 5 पुडे.

आमच्या देवीदास अण्णाच्या अंगावर मुठभर मांस चढलेले…

दुसर्या दिवशी बौद्ध वाड्यात कौतुक…

हिंदूंच्या वाड्यात जाउन आमच्या सोयर्याने बाजी मारली म्हणून !

आजही ती आठवण आली की,

हसावे की रडावे कळत नाही …

पण त्या ग्रामस्थानी माझ्यातील कलावंत

नक्किच इंचभर मोठा केला होता.

अशा सर्व ” माणसां ” मुळेच आज 5 राज्यात प्रसिद्ध झालेला मी विनयपूर्वक उभा आहे.

धन्यवाद माय-बापहो,जयभीम !

  • डॉ. विलासराज भद्रे 

________________________________________

मला आवडलेले बाबासाहेबांचे ज्वलंत विचार…


जगात अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्मातील अनुयायांत नानाप्रकारचे भेद दिसून येतात कोणी गरीब, कोणी श्रीमंत,कोणी ज्ञानी तर कोणी अज्ञानी हे सामान्य भेद सर्व धर्मात आहेत. त्याचप्रमाणे काही व्यवसायपरव्ते पडलेले विशिष्ट भेदही एकाच धर्मात अनुयायांत दिसून येतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र,हे भेद हिंदू धर्मातच आहेत असे नाही. ते ख्रिश्चन व मुसलमान धर्मात दिसून येतात वरील सामान्य तसेच विशिष्ट प्रकारचे भेद सर्वत्र सारखे असल्यामुळे हिंदू समाजात पडू पाहणारे तट इतर समाजात पडलेल्या तटा सारखे असतील, असा साधारणपणे समज होणे अगदी शक्य आहे. तरी पण हिंदुसमाजात आज जो ब्राह्मण ब्राह्मणेतर तट कितीएक दिवसांपासून पडला आहे. तो तट काही अंशी अगदी अपूर्वसा आहे; इतका की, त्याला अन्यत्र साम्य सापडणे कठीण आहे.

युरोपात ज्या अनेक चळवळी झाल्या त्यांच्या नावात राजा राजेतर पॉप पोपेतर, श्रीमंत श्रीमंतेतर असा फरक जरी केला तरी अशा नामांतरापासून ब्राह्मणेतर चळवळीचे रहस्य कळणे. सुलभ होईल असे आम्हास वाटत नाही. याचे कारण असे की, ज्या भेदावर ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची उभारणी झाली आहे तो भेद इतर धर्मात नसून फक्त हिंदुधर्मातच काय तो आहे. तो भेद हा की, इतर धर्मातील अनुयायांत जे भेद दिसून येतात ते गुनभेद विभागश: या तत्वाच्या पोटी उत्पन्न झालेले आहेत. त्याच तत्वावरून साहजिकपणे पडणाऱ्या उभ्या भेदाची तटबंद्या हिंदुसमाजात आहेतच. पण त्याशिवाय जन्मजाती विभागाश: या तत्वानुरूप पडणाऱ्या आडव्या भेदाच्या ज्या अनेक तटबंद्या हिंदुसमाजात दिसतात त्या दुसऱ्या कोणत्याच समाजात दिसत नाहीत. या दुहेरी विभागानुसार गुणभेदाच्या उभ्या तटबंदीमुळेच एकाच वर्गात येणारे लोक जातीभेदाच्या आडव्या तटबंदीमुळे पृथक पृथक होऊन बसले आहेत. दृष्टताच्या रूपाने सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की, धनभेदानुरूप वर्गीकरण केले तर श्रीमंत व गरीब असा गुणभेद सर्व समाजात होऊ शकतो. पण इतर समाजत जशी येथे या भेदाची मर्यादा संपते तशी ती हिंदुसमाजात संपत नाही. हिंदुसमजात या भेदाला आणखी पुढे एक शेपूट शिल्लक राहते; व श्रीमंत ब्राह्मण व श्रीमंत महार, ब्राह्मण मजूर व महार मजूर असा जसा दुसरा भेदभाव करता येतो तसा भेदभाव, करावयास अन्यत्र कोठेच वाव सापडत नाही. अन्य समाजात वर्गवारी एकेरी तत्त्वावर आली असल्याकारणाने तेथील सामाजिक चळवळीचा रोख उभे भेद नष्ट करण्याकडे असतो. परंतु ब्राह्मण ब्राह्मनतर चळवळीचे तसे नाही. तिचा सारा मारा हिंदू समाजातील आडव्या भेदाच्या तटबंदीवर आहे

हिंदू समाजात या आडव्या तटबंद्या कधी पडल्या याचा ऊहापोह आज आम्हास करावयाचा नाही. आज इतकेच सांगितले म्हणजे बस्स आहे की, ऋग्वेद काळानंतर जेव्हा ब्राह्मदेव बाळंत झाला तेव्हाच ब्राह्मण जातीवाचक करंटी करटी जन्मास आली; व त्यांनी आपल्या भोवती प्रथमत: तटबंदी केली. ही तटबंदी झाल्याबरोबर ब्राह्मण ब्राह्मणेतर हा भेदभाव जन्मास आला व गुणभेद विभागश: हे तत्त्व अजिबात गाडले जाऊन त्याच्या ऐवजी जातीभेद विभागश: हे तत्त्व प्रस्थापित करण्यात आले. पुढे काला नुसार ब्राह्मण जातीसाठी जसा ब्राह्मदेव बाळंत झाला ब्राह्मणेतरातही जे अनेक वर्गभेद होते, त्या वर्गानी कोणा ना कोणास बाळंत पणा वेदना सहन करावयास लावून आपण अमुक एका ऋषीपासून उत्पन्न झालो, असे मानून इतर वर्गापासून भिन्न आहोत, अशी भावना दृढमूल करून घेतली व ब्राह्मण वर्गाप्रामाणे दरेक वर्गाने आपल्याभोवती तट बांधण्याच्या कामास सुरुवात केली. या तटबंदीचा मूळ हेतू इतरांपासून आपण अलग आहोत, एवढे दर्शविण्यापूरताच असता तरी बरें झाले असते. परंतु ज्या ब्राह्मण वर्गाने प्रथमतः तटबंदी करण्यास सुरवात केली त्या ब्राह्मण वर्गाचा तटबंदी करण्याचा मुख्य हेतू इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे दाखविण्याचा होता, हे निर्विवाद आहे. ब्राह्मणेतर लोकांत समाविष्ट होणाऱ्या वर्गानी जेव्हा या तटबंदी च्या पध्दतीचे अनुकरण केले तेव्हा त्यात अंगभूत झालेल्या श्रेष्ठ कनिष्ठ भावणेचेही सहजगत्या त्यांच्याकडून अनुकरण झाले. या तटबंदीमूळे हिंदू समाजात सर्वत्र अशी भावना पसरली की, दरेक जातीस आपण दुसऱ्या जातीपासून अगदी भिन्न आहोत, इतकेच नव्हे तर कोणत्या ना कोणत्या इतर जातीपेक्षा आपली जात श्रेष्ठ आहे, या भावनेने साऱ्या जाती अगदी पिडून गेलेल्या दिसतात. ब्राह्मण्याची व्याख्या कोणी कशीही करो. जन्मजात उच्चनीच भाव हीच ब्राह्मण्याची खरी व्याख्या आहे असे आम्हास वाटते व तशाच अर्थी या शब्दाचा आम्ही उपयोग करणार आहोत.

ब्राह्मण्याचा उगम झाल्यापासून ब्राह्मणेतर जनतेने त्याच्याविरुद्ध झगडा मांडला होता हे ज्यांनी प्राचीन इतिहासाचे अवलोकन केले असेल त्यांना सहज कळून येण्यासारखे आहे. परंतु, हल्लीच्या काळी या वादाला जितकं निकरांचे स्वरूप आले आहे, तितके यापूर्वी केव्हाच आलेले नव्हते. पूर्वीच्या काळी हिंदू समाजाच्या वर्गवारी घड्या गुणभेद विभागश: किंवा जातीभेद विभागश: या दोहोंपैकी कोणत्याही पाटावर घातल्या तरी त्या सारख्या पडत. दोन्ही प्रकारच्या घड्यात तिडेबाके फारसे कोठे होत नसे. याचे कारण जाती जश्या जन्माने श्रेष्ठ तशा गुणानेही श्रेष्ठ असत, व जन्माने कनिष्ठ तशा गुणांनेही कनिष्ठ असत. यावरून श्रेष्ठ जातीचे श्रेष्ठ गुण व कनिष्ठ जाती तील कनिष्ठ गुण यांची ही सांगड, हा काही दैविक प्रकार होता, असे कोणी मानू नये. कनिष्ठ मानलेल्या जाती आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मूकनायक 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०) आणि प्रबुद्ध भारत (१९५६) अश्या चार वृत्तमानपत्रांना जन्म दिला. “जनता पत्राचेच नामकरण “प्रबुद्ध भारत” असे करण्यात आले.

बहिष्कृत वर्गात जागृती करून त्यांना हिंदू समाजातील इतर घटकांच्या समान दर्जा प्रस्थापित करून देणे व याकरीता इंग्रजांकडून भारतीयांकडे सत्तातरण होत असताना दलितांना त्यात सहभागी करणे हा त्यांच्या चळवळीचा प्रमुख हेतू होता. हिंदू धर्माचे सामाजिक व मानसिक गुलामगिरीतुन दलितांना मुक्त करायचे म्हणजे त्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे असे त्यांना वाटे व या प्रबोधनाकरिता वृत्तपत्र असणे आवश्यक होते,

हिंदू धर्मियांनी रुजविलेल्या अन्यायकारक रुढीमध्ये रुतलेली, खोलवर गेलेली होती, ती खणून काढताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जहाल भाषा वापरणे आवश्यक होते, परंतु आज हे लेखन वाचतांना त्यामागची डॉ.आंबेडकरांची तळमळ जाणवते, त्यातील महत्वाची गोष्टी ही होती की दलितांचे दुःख, त्यांच्यावरचे अन्याय ही काही त्यांनी दुरून 11 खोतांच्या जाचातून सोडवण्यासाठी खोती निर्मूलन बिल त्यांनी मांडले. या111 त्यांच्या चळवळीत महार,मांग,चांभारांप्रमाणेच कुणबी,तेली,माळी,मराठे,ब्राह्मण वगैरे सर्व जातींचे तसेच मुसलमान, खि्सती लोक देखील समाविष्ट होते ही बाब लक्षात घ्यायला हवी.

राष्ट्रीय प्रश्नांनाही त्यांनी हात घातला. गिरणी कामगारांच्या संपावर जसे त्यांनी आपले मत प्रकट केले तसेच मोतीलाल नेहरू कमेटीने ब्रिटिश सरकारला सादर केलेल्या रिपोर्टावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त केली.

मूकनायक

हे पत्र १९२० मध्ये प्रसिद्ध झाले. या खंडात समाविष्ट केलेल्या अंकातून अस्पृश्यांच्या कोल्हापूर आणि नागपूर येथील दोन परिषदांचे वृत्तांत दिलेले आहेत, या दोन्ही परिषदांना छत्रपती शाहू महाराज हे उपस्थित राहून त्यांनी चळवळीला मोलाचे मार्गदर्शन केलेले आढळते

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड प्रमाणात समाज सुधारणा केलेल्या आहेत, त्यांनी दिवस रात्र एक करून बारीकातला बारीक अभ्यास करून त्या वर प्रकाश टाकला आहे.

बाबासाहेबांचे तत्वज्ञान

‘‘तुमच्यासमोर उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे, हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोडय़ाशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. अंत:करणातील आकांक्षा फारच मोठय़ा आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय.’’ -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ :

Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).

भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

  • रोहित रंजना जाधव

9561753793

rj673101@gmail.com

________________________________________

मला आवडलेले बाबासाहेबांचे ज्वलंत विचार…


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे  तसे पहायला गेले  तर एक नाव पण या व्यक्ती कड वैचारिक दृष्टिकोनातून पहायला गेले तर. माणसाच्या बुद्धीला  ज्वलंत विचाराने पेटवणारी विचारांची संस्थाच आहे.

चीनबाबत बाबासाहेबांचे विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चीनबाबत धोक्याचा इशारा दिलेला आहे. अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रे यांबरोबरच चीनसंदर्भातही डॉ. आंबेडकरांचे धोरण अतिशय स्पष्ट होते. चीन हे अतिशय धूर्त राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्राबाबत भारताने गाफील राहून चालणार नाही. तसेच आदर्शवादी दृष्टीकोनातून चीनशी मैत्री करण्याचे प्रयत्न भारताने करू नये, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. त्या काळामध्ये जवाहरलालनेहरूंचे धोरण हे काहीसे चीनचे लांगुलचालन करणारे होते. त्यामुळेच इ.स. १९४९ मध्ये कम्युनिस्ट चीनला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्त्व मिळावे यासाठी भारताने जोरदार मागणी केली होती. साहिजकच, त्यावर बाबासाहेबांनी टीका केली होती.

इ.स. १९५४ मध्ये भारताने चीनसंदर्भात तयार केलेले पंचशील धोरण संसदेमध्ये चर्चेसाठी आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी फार उत्तम प्रकारे त्यावर टीका केली होती. ते असे म्हणतात, “पंचशील धोरण हे बौद्ध धर्माचा अविभाज्य घटक आहे. पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही. चीन जर तिबेटी लोकांवर अन्याय करत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला.” त्यावेळी भारत चीनला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा कायम सदस्यत्व मिळावे म्हणून पाठिंबा देत होता याही गोष्टीला डॉ . आंबेडकर यांचा विरोध होता .

शेतकऱ्यांबाबत बाबासाहेबांचे विचार

बाबासाहेबांना जसे उच्च नीच समाजव्यवस्थेची जाणीव होती तसेच शेती बद्दल ही भान होते.शेती म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन ही जी मानसिकता येथील शेतकर्यांाची आणि राज्यकर्त्यांची होती त्याला बाबासाहेबांचा आक्षेप होता, शेती हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून. राष्ट्रीय उत्पन्नाचा मार्ग आहे.ग्रामीण भारताचा आर्थिक विकासाचा मुख्य स्त्रोत आहे.अनेक शेतमजूरांना रोजगार मिळवून देण्याचे सशक्त साधन आहे यामुळेच शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन हवा.यासाठी बाबासाहेब नेहमी आग्रही असत. आपल्या कृषिप्रधान देशात पाणि व वीज यांचा योग्यरीत्या पुरवठा झाला तर भारत हा एक समृद्ध देश होईल.१९२८ ते १९३४ या काळात बाबासाहेबांनी रायगड जिल्ह्यातील चरी या गावात पहीला शेतकरी संप घडवून आणला या संपात कोकणातील खोत पद्धती (ही एक प्रकारची सावकारकी सारखी आर्थिक शोषण करणारी व्यवस्थाच होती) नष्ट व्हावी या साठी तब्बल सात वर्ष संघर्ष करावा लागला शेतकर्यांरनी राब राबायचे आणि खोतांनी फुकटचे खायचे हे त्यांना मान्य नव्हते शेवटी या खोत पध्दतीला निर्बंध लावण्यासाठी त्यांनी काही कायदे ही केले.

बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांतनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.

आधुनिक भारताची सर्व समाजव्यवस्था ही बाबासाहेबांच्या दूरदृष्टीवरच आधारित आहे.हे भारताच्या समाजव्यवस्थेचा अभ्यास केल्यासच लक्षात येईल. भारताचे अर्थकारण, राजकारण, समाजकारण आणि भारताचे शेतकरी कामगार उद्योजक या सर्वांचे भले-बूरे विचारात घेऊन बाबासाहेबांनी घटनेत कमालीचे निकष लावून भारतीय राज्यघटना पूर्णत्वास नेली आहे,

बाबासाहेब हे नुसते विचार मांडून शांत बसणाऱ्यांपैकी नव्हे तर विचाराला कृतीतून पूर्णत्वास नेणार भारतातील दिग्गज व्यक्तीमत्व महान राजकारणी समाजकारणी धूरंधर पूढारी होते, अशा महान विचारवंताची आपण सरत्या वर्षात १३० वी जयंती साजरी करतोय… महामानवास जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम व संबंध मानव जातीस हार्दिक शुभेच्छा…!

  • केतन मुंजाबा प्रधान

पत्ता:-भीमनगर माजलगाव. ता.माजलगाव जि.बीड

8446584638


Ideologies of Dr babasaheb ambedkar which make me know more about him clearly!..

Some one address..Dr ambedkar is the tallest leader of dalits in India no other dalit leader could achieve what ambedkar could achive for his community..

As we all know that Dr babasaheb ambedkar used to called as the principle architect of the Constitution framing the Constitution was one of the difficult task which he have done it very well. And award our country a sovereign structure.

The pioneer of adult franchise which enshrined india as world largest democratic country..

To know there are verious ideologies of Dr ambedkar.but the ideologies which I like the most is socio political and religious.

If we look about religion his main work toward it is abolition of the caste system.and he himself exercise annihilation of caste. According to ambedkar the caste system was used to be carried out on those days he was not satisfied about that.on the basis of above he attempt to scientific understanding of the origin of caste on the basis of antropological research his important work on the issue was reflected his book named as CASTE IN INDIA AND WHO WERE THE SHUDRAS ORIGIN OF UNTOUCHABLES. And his efforts towards abolition of the caste system was enshrined in article 17 of the Constitution which also talk about abolition of untouchablity and impart civil rights to schedule caste and schedule tribes.

According to ambedkar Hindu was not the bad people there main problem is that they are highly religious and hence due to this the Hindu social reformers would not successful. There is nothing nothing in Hinduism except caste system hen he held that there is need to put dynamite on Vedas and manusmriti. On the reaction to that at 14 Nov 1956 he converted into Buddhism this gave a particular religion to the depressed class he address that “IAM disowning the religion of birth, IAM reborn, I reject religion which threat me inferior”. His contribution towards socio political and justice for citizens were also gain highly importance in today’s contemporary India . By improving the status of dalits in India. Allowing them to enter into politics. Early days his work for such makes him to established the dalits association bahiskrit hitkarni Sabha to put forward the demands of dalits in front of the British government. one of his great attempt was demand before the Simon commission which was arrived in India for the Constitutional reform in 1927. On behalf of bahiskrit hitkarni Sabha he submit the memorandam of demand as follows.

1) political rights for depressed classes

2) reserved seats for the depressed calsses in assembly if there was an universal adult franchise. Was grant.

3) if it possible Western education for dalits and there entry into public service.unfortunately his demand was not enforced..but no one has know about this. I think so..

As he used to said politics should be done for social walfare. Which was now a days remain dead nail. Ambedkar work for social justice prove to be and added advantage for each and every section of the Indian society. He see justice in the context of peculiar form of injustice found in Indian society social justice for ambedkar ment life of dignity and this was reflect in “article 21” of the Constitution which state that no person shall be deprived from his life and personal liberty. And this is one of our fundamental right it was ambedkar idea of social justice which inspired him as a law minister to bring the

HINDU CODE BILL an attempt to reform in Hinduism which also challenge the petriarchy present in Hindu personal law based on manuwadd.the special right which the minority have in the Indian society can be attribute to ambedkar idea of social justice

To conclude he is the great leader of Indian nation who thought not only for depressed classes but for the walfare of society together. This we need to incorporate his ideas rather just following him..

As he said EDUCATE AGITATE AND ORGANISED a motto for dalits which found to be golden words.remain Marley just an idea. In my opinion for today being educated a very difficult task as compared to organize which used to be very simple.

This is small attempt from my side to put the light on the ideas of Dr ambedkar which every one has to know.

  • Rohit Dhabadge


आपल्यापैकी कोणाला महानायक सोबत तन , मन धनाने काम करण्याची इच्छा असल्यास मेसेज बॉक्स मध्ये आपले स्वागत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!