AurangabadNewsUpdate : कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू

औरंगाबाद : औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . गुलाबराव ढवळे असे रुग्णाचे नाव असून हा रुग्ण तब्बल साडेचार तास ऑक्सिजन विना शौचालयांमध्ये पडून होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे .
रात्रीच्या सुमारास शौचालयात गेलेला हा रुग्ण चक्कर येऊन शौचालयात पडला त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्याकडे कुठलेही लक्ष दिले नाही तब्बल साडेचार तास रुग्ण परत न आल्यामुळे इतर रुग्णांनी तक्रार केल्यानंतर स्वच्छालयात जाऊन तपासला असता स्वच्छालय दार बंद होते त्यानंतर दरवाजा तोडून पाहिलं असता रुग्ण हा बेशुद्धावस्थेत पडल्याचे समोर आले त्यानंतर रुग्णाला तपासला असता त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं शौचालयात जाऊन मृत्यू झाल्यानंतर तब्बल साडेचार तास जिल्हा रुग्णालयाने या रुग्णाकडे लक्ष न दिल्यामुळे औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
दरम्यान या विषयी बोलतांना जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ.सुंदर कुलकर्णी म्हणाले की, ही घटना आज सकाळी ५.३० ची आहे.ढवळे यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून उघडता येत नसल्याचे सांगितल्यावर स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडून बाहेर काढला तेंव्हा ढवळे जिवंत होते. त्यानंतर त्यांना आॅक्सिजन दर मि.१५ लिटर या वेगाने लावला.पण त्यांची प्रकृती खालावली म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर घेतले.पण सकाळी ७.४० वा.त्यांचा मृत्यू झाला