Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह 19 जणांना कोरोनाची लागण

Spread the love

23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ हजारों लोक जमले होते. त्यावेळी ज्या गोष्टीची भीती वर्तवण्यात आली होती ती खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही वृत्त आहे.

कबिरदास महाराजांनी 21 तारखेला कोरोनाची टेस्ट केली होती. मात्र तरीही ते संजय राठोड पोहरादेवी येथे आले तेव्हा दिवसभर त्यांच्यासोबत होते. कबिरदास महाराज पोहरादेवी मंदिर आणि सेवालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आहे. संजय राठोड यांनी 23 फेब्रुवारी रोजी प्रथम महंत कबिरदास महाराज यांची भेट घेतली होती. त्यादिवशी विविध ठिकाणहून हजारो जण पोहरादेवीत उपस्थित होते. मात्र आता या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास संक्रमणाची मोठी भीती व्यक्त केली जात आहे.

संजय राठोड यांच्या वाशिम दौऱ्यादरम्यान पोहरादेवी इथल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. कोरोनाविषयक आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. कोविड काळात नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितावर प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. दरम्यान, वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक, वसंत परदेशी, यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोहरादेवी येथे लोकांनी गर्दी केल्या प्रकरणी नावे निष्पन्न झालेल्या १० जणांसह ८ ते १० हजार लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड 23 फेब्रुवारी पोहरादेवी येथे दाखल झाले होते. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!