#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी

Spread the love

Image result for gif media newsकेंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.

#CoronaUpdate

21.02.2021 । अकोला जिल्ह्यातील अकोला महापालिका क्षेत्र, अकोट आणि मुर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात 23 फेब्रुवारीच्या सकाळी 6 वाजतापासून कडक लॉकडाऊन. 1 मार्चला सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार लॉकडाऊन. सकाळी 8 ते 3 वाजेदरम्यान राहणार जीवनावश्यक सेवांची दुकानं सुरू.

21.02.2021 । कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज कोरोना बाधित 147 रुग्णांची नोंद. उपचार घेत असलेले रुग्ण 1117. 24 तासात कोरोना बाधित 1 जणांचा मृत्यू. कोरोनामुळे 1189 जणांचा मृत्यू. कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्रात कोरोना बाधित 61983 रुग्ण संख्या. केडीएमसी क्षेत्रात 59,6 77 रुग्णांनी केली कोरोनावर मात.

21.02.2021 । नाशिकमध्ये उद्यापासून रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं प्रशासनाचा निर्णय. छगन भुजबळ यांच्याकडून पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती.

21.02.2021 । अमरावतीत उद्यापासून लॉकडाऊन होणार. अमरावती शहर आणि अचलपूरमध्ये लॉकडाऊन राहणार. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती. उद्या रात्री 8 पासून सात दिवस लॉकडाऊन राहणार.

21.02.2021 । लातूरमध्ये कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ट्विट करत दिली याबाबतची माहिती. अनेक सोशल मीडिया ग्रुपवर लातूरमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचे संदेश व्हायरल होत आहेत. मी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो की, लातूरमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची कोणतीही चर्चा किंवा निर्णय झालेला नाही. अशा प्रकारचं वृत्त पूर्णपणे खोटं असून, नागरिकांनी चिंता करण्याचं कारण नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

#CurrentNewsUpdate

21.02.2021 । कार्यालयीन वेळांची विभागणी करा, शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम सुरु ठेवा असे आवाहन मुख्यमंत्र्यंनी केले आहे.

21.02.2021 । मी जबाबदार! ही एक नवी मोहिम राबवूया. घराबाहेर पडताना मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, कार्यालयीन वेळा बदलणे या साऱ्याचा यात समावेश.

21.02.2021 । शासकीय कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याचं आवाहन. राजकीय कार्यक्रम, मोर्चे, गर्दी करणारी आंदोलनं यांच्यावर उद्यापासून बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

21.02.2021 । आजच्या दिवसात जवळपास 7 हजार कोरोना रुग्ण सापडले. एका आठवड्यात मुंबई- पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

21.02.2021 । कोरोना योद्धे नाही झालात, तर कोरोनाचे दूत तरी होऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

21.02.2021 । अर्थचक्राला गती देताना कोरोना पुन्हा फोफावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

21.02.2021 । कोरोनाविरोधातील लढाईत मास्क हिच आपली ढाल, लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिर्वाय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

21.02.2021 । लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय असेल अथवा नसेलही. पण, संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळणं हा एक महत्त्वाचा उपाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

21.02.2021 । कोरोना वाढतोय असं म्हणत राज्यातील परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांनी वेधलं लक्ष

21.02.2021 । महाराष्ट्र कोरोनाशी युद्ध लढतोय, आतापर्यंत 9 लाख नागरिकांना लस देण्यात आली. येत्या काळात आणखी एक-दोन कंपन्या लस उपलब्ध करुन देणार, त्यानंतर जनतेसाठी कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करणार- उद्धव ठाकरे

21.02.2021 । घरामध्ये बंद करुन ठेवणं कुणालाही आवडणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

21.02.2021 । आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधणार, राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय होण्याची शक्यता.

21.02.2021 । नीती आयोगाची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेत बैठक, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री होणार सहभागी

21.02.2021 । ‘मास्क न वापरणाऱ्यांना उद्यापासून दंड’ ‘दंड किती आकारायचा हे उद्या जाहीर करणार’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

21.02.2021 । मुंबई मनपाची विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई, 10 महिन्यातं 15,71,679 विनामास्क लोकांना दंड 31,79,43,400 रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल.

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.