#FarmerTractorRally : प्रशासन आणि राकेश टिकैत यांच्यातील चर्चा फेल… राकेश टिकैत यांनी दिली आत्महत्येची धमकी

Advertisements
Advertisements
Spread the love

राकेश टिकैत शेतकरी आंदोलनातील नेते यांनी माध्यमांसोबत बोलताना आत्महत्येची धमीकी दिली आहे. दरम्यान, ते रडत म्हणाले, जर तीनही कृषी कायदे मागे घेतले नाही, तर मी आत्महत्या करेल. मला काही झाले, तर त्याला प्रशासन जबाबदार असेल. एवढेच नाही, तर मी शेतकऱ्यांना बर्बाद होऊ देणार नाही. शेतकऱ्यांना मारण्याचे शडयंत्र होत आहे. हा अत्याचार होत आहे.

Advertisements

गाझीपूर बॉर्डरवर प्रशासन आणि राकेश टिकैत यांच्यातील चर्चा फेल झाली आहे. यानंतर राकेश टिकैत यांनी आरोप केला आहे, की भाजप आमदार पोलिसांसोबत आले आहेत. आता यांची दादागिरी चालणार नाही. गाझीपूर बॉर्डरवर राकेश टिकैत म्हणाले, आपण पोलिसांच्या स्वाधीन होणार होतो. मात्र, भाजप आमदारांनी आमच्या लोकांसोबत मारहाण केली आहे. आमच्या लोकांना रस्त्यात मारहाण करण्याची योजना आहे. त्यामुळे आता आम्ही येथून जाणार नाही. आम्ही येथेच बसणार. गाझीपूर बॉर्डरवर सध्या मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाचे चमूही आंदोलन स्थळावर उपस्थित आहेत. याशिवाय स्थानिक लोकही येथे जमले असून त्यांनी रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे.

Advertisements
Advertisements

आंदोलक शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चावेळी अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. बऱ्याच भागांमध्ये हिंसाचार झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज लावला. या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर आता दिल्ली पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना 3 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे

आपलं सरकार