Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : आंतरराज्यीय कार चोरांची टोळी पकडली ग्रामीण गुन्हेशाखेची कारवाई.

Spread the love

औरंगाबाद -तीन कार! एक मोटरसायकल आणि सात मोबाईल हॅंडसेट अशा १९लाख २४ किमतीच्या ऐवजा सहित ५चोरट्यांना ग्रामीण गुन्हेशाखेने अटक करुन कन्नड शहर पोलिसांच्या हवाली केले आहे.
शेख दाऊद शेख मंजूर(५५) त्याची दोन मुले शेख नदीम (२२)व शेख जिशान(२२) तिघेही रा.धाड बुलढाणा,सखाराम भानुदास मोरे (३१) व दिपक दिगंबर मोरे(२०) दोघेही रा.निरखेडा जालना अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील आरोपींनी जालना, परभणी ,जळगाव, अहमदनगर, कार चोरलेल्या असून बाहेर राज्यात इतर साथीदारांच्या मदतीने विकल्याचे तपासात उघंड झाले.
वरील कामगिरी पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप सोळंके, पोलिस कर्मचारी संजय काळे,दिनेश नागझरे, श्रीमंत भालेराव, योगेश तरमाळे, संजय भोसले यांनी पार पाडली

कंपनीतून ६लाखांचा मुद्देमाल लंपास करणारा वाळूज औद्योगिक पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद – ऐन सणासुदीच्या काळात ठेकेदाराने कामावरुन काढल्यानंतर कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी कंत्राटी कामगाराने चोरलेला ६लाख रु.चा मुद्देमाल वाळूज औद्योगिक पोलिसांनी जप्त करंत आरोपी २४तासात अटक केला आहे.

सतीष गोरखनाथ खोसे(२७) रा.शांतीनगर रांजणगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. वरील आरोपी हा संजू आॅटो प्रा.लिमीटेड कंपनीत कंत्राटी पध्दतीने कामावर होता. पण दसर्‍याच्या दोन दिवस आधि त्याला ठेकेदाराने नौकरीवरुन काढले होते. म्हणून आरोपी खोसे ने डंपर हब आणि स्पीड गेअर हब अशा ५लाख ८९ हजारांच्या मशीनरी लंपास झाल्या होत्या. या प्रकरणी वाळूज औद्योगिक पोलिसांकडे गुन्हा दाखल होता. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वावळे यांनी घटनास्थळाचे सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासले असता. वरील आरोपी निष्पन्न झाला. खोसेला विश्र्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देत चोरलेला मुद्देमाल पोलिसांच्या हवाली केला. वरील कारवाई पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे, एसीपी श्रीकांत सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.या कारवाईत पोलिस कर्मचारी कय्यूमखाॅं पठाण, प्रकाश गायकवाड,सुधीर सोनवणे, रेवणनाथ गवळे, नवाब शेख यांनीही सहभाग घेतला होता.

चरसाविक्री दौघांना बेड्या,विशेष पथकाची कारवाई

औरंगाबाद – मिटमिटा परिसरात दुपारी ४वा. पोलिसआयुक्तांच्या विशेष पथकाने चरस विक्री साठी घेऊन फिसतांना दोघांना अटक केली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बाबूखान इसाकखान (५२) रा. असूरखाना उस्मानपुरा,व मोहम्मद रशीद मौहम्मद हसन (५४) रा. खुलताबाद अशी अटक आरोपींची नावे आहेत.या दोघांकडे ५२ हजार ५००रुपयांच्या चरस च्या गोळ्या आढळून आल्या.पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांना वरील आरोपी चरसविक्रीसाठी शहरात येत असल्याची माहिती मिळाली हौती. त्यानुसार एपीआय राहूल रोडे, पोलिस कर्मचारी सय्यद शकील, विनोद पवार यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!