Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : व्यसनाधीन मुलाने स्वता:चे घर फोडल्याचा केला बनाव,पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या

Spread the love

औरंगाबाद – व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने दोन मित्रांना सोबंत घेत स्वता:चे घर फोडणार्‍या तरुणासहित दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.दिनेश शिंदे(२३) सुमित प्रसाद आणि कृष्णा लघाने अशी अटक आरोपींची नावे आहेत. रविवारी (दि१५) रोजी रेणूकानगर गारखेडा परिसरात देविदास शिंदे राहतात ते दिवाळी निमीत्त सिल्लोड तालुक्यातील त्यांच्या शिंदेफळ नावाच्या गावी गेले होते. गावी जातांना शिंदे यांची पत्नी उषा यांनी घरातील दागिने पिशवी मधे ठेवून ड्रम मधे ठेवली व गावी गेल्या. त्यावेळी मुलगा दिनेश घरी एकटा होता. रविवारी दिनेश दुपारी ३च्या सुमारास शिंदेफळ येथे गेला.

दरम्यान आईने लपवून ठेवलेले पावणे दोन लाख रु.चे दागिने मित्रांच्या स्वता:चे घर फोडून लंपास केले. रात्री घरातील लाईट सुरु आणि दरवाजा उघडा दिसल्याने शिंदे यांचे किरायेदार बनकर यांनी उषा शिंदे यांना फोन करुन घर उघडे असल्याचे सांगितले. म्हणून रविवारी पहाटे २ वा. देविदास शिंदे व त्यांचा आरोपी मुलगा घरी आले. पोलिसांना घरफोडीची माहिती दिली.सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे यांनी तपास पीएसआय मुळे यांच्याकडे सोपवला.तसेच कुटुंबा विषयी शेजारी पाजारी माहिती घेतली असता. शिंदे यांचा मुलगा व्यसनाधीन असल्याचे कळले. त्यांनी दिनेश ला विश्र्वासात घेत चौकशी केली असता.त्याने आईचे दागिने चोरुन २६ग्रॅम दागिन्यावर मन्नपुरम गौल्ड मधून ८५हजार कर्ज घेत उधारी फेडली. व उरलेले चोरीचे दागिने दुसरा आरोपी सुमित प्रसाद कडे ठेवले.त्यामुळे खरा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी वरील तिघांना बेड्या ठोकल्या एपीआय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुळे पुढील तपास करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!