UttarPradeshNewsUpdate : लव्ह जिहाद करून महिलांच्या सन्मानाशी खेळाल तर ” राम नाम सत्य..” होईल : योगी आदित्यनाथ

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे आज योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. तसेच, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता “राम नाम सत्य..”  होईल. असा गंभीर इशारा ही  दिला आहे. या निमित्ताने बोलताना योगी म्हणाले की, आम्ही ऑपरेशन शक्ती राबवत आहोत. ऑपरेशन शक्तीचा हाच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही महिलांची सुरक्षा करणार आहोत. त्यांच्या सन्माचे रक्षण करणार आहोत. न्यायालयाचे आदेशाचे देखील पालन होणार व महिलांचा सन्मान देखील होणार आहे.

Advertisements

जौनपूर आणि देवरिया येथील सभेत ते बोलत होते . यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि ,  अलाहाबाद न्यायालयानं निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे. सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशार देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार