Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

Spread the love

औरंगाबाद – दोन रेकाॅर्डवरील गुन्हेगार शहरात फिरत असल्याची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी वेदांतनगर आणि सातारा पोलिसांच्या हवाली केले. अजय लक्ष्मण चौधरी(३२) इटखेडा आणि किशोर अशोक शिंदे(२३) रा.मुकुंदवाडी असे अटक आरोपींची नावे आहेत.

अजय लक्ष्मण चौधरी हा शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास हा जालनारोडवरील मुथुट फायनान्स च्या कार्यालयासमोर उभा होता. गेल्या दोन दिवसांपासुन कासारी बाजारातील सराफाकडे दागिने मोडण्यासाठी चकरा मारत होता. त्याच्या जवळ असलेला ऐवज हा घरफोडी प्रकरणातील असावा अशी माहिती खबर्‍याने पोलिसांना दिली होती. बन्सीलालनगरातील बजाज फायनान्स कार्यालयात जाऊन त्याने मुथुट व ब्लू फायनान्स कंपनीकडे ८ग्रॅमची अंगठी व १०ग्र.वजनाचा पॅंडंट सोडवण्यासाठी कर्जाची मागणी करण्यासाठी गेला होता. त्यानुसार बजाज फायनान्स मधी ल कर्मचारी राहूल शिंदे यांना विश्र्वासात घेत त्याच्याकडे असलेल्या सहा बांगड्या आणि वरील दोन्ही फायनान्स कंपनीत ठेवलेला ऐवज सोडवून बजाज फायनान्स कडून दीड लाख रु.घेणार होता. त्यानुसार शांदे हे आरोपी अजय सोबंत वरील दोन्ही फायनान्स कार्यालयात गेले व ७०हजारात दोन्ही वस्तू सोडवून घेत बजाज फायनान्स कंपनीत जातांना पुंडलिकनगर पोलिसांनी अजय चौधरी ला व शिंदे यांना ताब्यात घेत झडती घेतली.

आरोपी चौधरी कडील सहा बांगड्या सोनारा कडून चेक करुन घेतल्या असता त्या बनावट निघाल्या म्हणून बजाज फायनान्सच्या शिंदे यांच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी चौधरी ला वेदांतनगर पोलिसांनी अटक करताच चौधरीने कार चोरी  झाल्याची खोटी तक्रार वेदांतनगर पोलिसांना लाॅकडाऊनच्या काळात दिल्याचे उघड झाले.त्याच प्रमाणे दुसरा आरोपी किशोर अशोक शिंदे हा २०१८ पासुन दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला चिकलठाण्यातून शनिवारी दुपारी १२च्या सुमारास पकडून सातारा पोलिसांच्या हवाली केला. वरील कारवाई एपीआय घन्नशाम सोनवणे, पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, बाळाराम चौरै,शिवाजी गायकवाड, विलास गायकवाड, प्रवीण मुळे,रवी जाधव यांनी पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!