AurangabadNewsUpdate : भारत पेट्रोलियमने गॅस एजन्सी देण्याकरता निवडलेल्या व्यापार्‍याला भामट्याने लावला ५६ लाखांचा चुना

Spread the love

औरंगाबाद – जानेवारी २०२०मधे भारत पेट्रोलियमने गॅस एजन्सी देण्यासाठी निवडलेल्या व्यापार्‍याला भामट्याने भारत पेट्रोलियम चा अधिकारी असल्याचे ओळखपत्र व फिर्यादीला गॅस एजन्सी देण्यात आल्याचे सर्टफिकेट व्हाॅटसअॅपवर पाठवून ५६लाख६१हजार ७००रु.ना चुना लावला.या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. चांगदेव सोमनाथ तांदळै (४९) रा.सिडको वाळूज महानगर असे फसवणूक झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , दि.१ आॅगस्ट २०१९रोजी दै.सकाळ मधे भारत पेट्रोलियम ने गॅस एजन्सी वितरित करण्यासाठी जाहिरात दिली होती .त्यानुसार तांदळे यांनी औरंगाबादच्या भारत पेट्रोलियम कार्यालयात अर्ज २९आॅगस्ट रोजी भरुन दिला.त्यानंतर २१जानेवारी रोजी भारत पेट्रोलियम ने गॅस एजन्सी मिळवण्यासाठी उत्सुक असल्यामुळे जळगाव येथील भारत पेट्रोलियम कार्यालयात चांगदेव तांदळेंची मुलाखत घेण्यात आली व वाळूज पंढरपूर परिसरात एजन्सी मिळणार असल्याचे भारत पेट्रोलियम ने कळवले.त्यानंतर मे २०२०मधे संदीप पांडे नावाच्या भामट्याने तांदळे यांना संपर्क करंत आपण गॅस एजन्सी साठी अर्ज केला आहे का ? अशी विचारणा केली. व www. lpgdistributors.in ही वेबसाईट व लाॅगिन आयडी पाठवला.त्याचप्रमाणे तांदळे यांना सांगितले की, भारत पेट्रोलियमकडून गोडावून साठी १८ लाख रु. व गोदाम भाडे व कर्मचार्‍यांचे वेतन असे मिळून ५० हजार रु.महिना मिळेल असे अमीष दाखवले.तसेच  संदीप पांडे हा भारत पेट्रोलियमचा अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र व तांदळे यांना डिलरशिप देण्यात आल्याचे सर्टफिकेट व्हाॅटसअॅपवर आरोपी पांडे याने पाठवून तांदळेंचा विश्वास संपादन केला. व त्यांच्याकडून कागदपत्रे मागवली वयानंतर ६मे ते ७आ२४जुलै २०२० या काळात ५६लाख ६१हजार ७००रु.वेगवेगळे कारणे सांगत उकळले. व एका आठवड्याने फोन करण्यास सांगितले. तांदळे यांनी ५६ लाख ६१ हजार पांडे ने सांगितलेल्या खात्यावर भरल्यानंतर जळगाव येथील भारत पेट्रोलियमच्या कार्यालयात विभागिय व्यवस्थापक अशोक डोंगरे यांची भेट घेऊन वरील रक्कम तुमच्या पांडे नावाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या खात्यात जमा केल्याचे सांगताच डोंगरे यांनी पांडे नावाची कोणतीही व्यक्ती भारत पेट्रोलियम मधे काम करंत नसल्याचा खुलासा केला. तांदळेंना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोालिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक गिता बागवडे करंत आहेत.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.