Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : माझ्या सोबत का राहत नाहीस ? म्हणून महिलेचा विनयभंग

Spread the love

आत्महत्या करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

औरंंंगाबाद : घराशेजारीच राहणा-या प्रियकराने सोबत येत नाही म्हणून आत्महत्या करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी घडली. अंबादास ज्ञानदेव घुगे (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे. अंबादासचे शेजारी राहत असलेल्या महिलेशी २०१५ मध्ये प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर अंबादास हा संशयावरून महिलेचा सतत पाठलाग करायचा. त्यामुळे वैतागून महिलेने अंबादास याला जाब विचारला त्यावर तू माझ्यासोबत राहिली नाही तर तुझ्या नावाने आत्महत्या करेल अशी धमकी देत आंबदासने महिलेला मारहाण केली. तसेच ब्लेकमेल करण्याची धमकी देत विनयभंग केला. यावरून महिलेने सिडको पोलीस ठाणे गाठत अंबादास विरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक भवरे करीत आहे.

मुकुंदवाडीतून मुलीचे अपहरण

घरातून किराणा दुकानावर जाऊन येते असे सांगून बाहेर पडलेल्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हि घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. घरी बहिणीला किराणा दुकानावर जाऊन येते असे सांगून सकाळी साडे आठ वाजता मुलगी घराबाहेर पडली. त्यानंतर घरच्यांनी तासभर तिची वाट बघितली. मात्र, ती घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या भावाने-बहिणीने आजूबाजूला तिचा शोध घेतला. नातेवाईकांकडे विचारपूस केली. पण ती मिळून आली नाही. त्यामुळे आखरे १५ सप्टेंबर रोजी मुलीच्या बहिणीने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी करत आहेत.

बांधकामावरून २३ हजारांचे साहित्य लांबविले

घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी जात चोराने साहित्य लंपास करून दरवाजा व फरशीचे तोडफोड केली. हा प्रकार दि. १२ ऑगस्ट रोजी सिडको भागात घडला. चोरट्यांनी चार नळ तोट्या, सात शोर्ट बॉडी, पाच टू इन वन मिक्सर, दोन कमोड कॉक, शावर, पाईप असा ३३ हजार ९२० रुपयांचा माल घराचे बांधकाम होत असलेल्या ठिकाणावरून चोरून नेला. हि बाब घर मालक प्रकाश देवीलाल जैस्वाल यांच्या लक्षात येता त्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार शेवाळे करीत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!