IndiaNewsUpdate : एनएसडीच्या अध्यक्षपदी सिनेअभिनेते परेश रावल यांची निवड

Spread the love

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी खासदार आणि सिनेचाहत्यांचे ” बाबुराव “अभिनेते परेश रावल यांची   नियुक्ती केली असल्याची माहिती  एनएसडीने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना परेश रावल यांनी म्हटले आहे की, हे काम आव्हानात्मक पण मजेदार असेल. आगामी  चार वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल असे कळविण्यात आले आहे. प्रसिद्ध रंगकर्मी डॉ. वामन केंद्रे यांनी या पदावर कार्य केले आहे.

याबाबत एनएसडीने ट्विट केले आहे की, “आम्हाला कळविण्यास आनंद होत आहे की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रसिद्ध अभिनेते आणि पद्मश्री परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. एनएसडी कटुंबीयांकडून त्यांचे स्वागत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसडी नवीन उंची गाठेल.” दरम्यान संस्कृती मंत्रालयाने ट्वीट करत म्हटलं की,, “प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दल अभिनंदन. त्यांच्या सक्षम नेतृत्वात एनएसडी नक्कीच नवीन उंचावर जाईल.”   ‘होली’ हा खा . परेश रावल यांचा पहिला सिनेमा होता . त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका सादर करून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले . परेश  पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत.

Leave a Reply

आपलं सरकार