SushantSingRajputDeathCase : CurrentUpdate : ED आणि CBI च्या चौकशीला वेग , होताहेत धक्कादायक खुलासे….

Spread the love

सक्तवसुली संचालनालयाने सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी  सुरू केलेल्या चौकशीनंतर वेगळाच मुद्दा प्रकाशात येत आहे.  याबाबत  सीएनएन न्यूज18 ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि , रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या  खात्यात थेट सुशांतच्या खात्यातून करोडो रुपये ट्रान्सफर झाल्याचं स्पष्ट होत आहे. सुशांतच्या खात्यातून थेट शौविकच्या खात्यात पैसे वळवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. कोटक बँकेतून हे पैशाचे व्यवहार झाल्याचं या अकाउंट्सवरून स्पष्ट होतं. ईडीने रियाबरोबर तिचा भाऊ, वडील आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या खुलाशांमुळे सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अभिनेत्रीला आज ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. त्याबरोबर तिचा भाऊ शोविकचीही कसून चौकशी करण्यात आली. रियाबरोबर तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती देखील चौकशी करता हजर होते. आज सुरू असलेल्या या ईडी चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान न्यूज18  ने दिलेल्या माहितीनुसार रियाच्या 2 प्रॉपर्टीसंदर्भात तिची चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे तिची बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे सुशांत सिंह राजपूतने 2019 ते जानेवारी 2020 या काळात 2 कंपन्या निर्माण केल्या, त्यामध्ये रियाचं योगदान काय त्याबाबत प्रश्न विचारले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. रियाच्या 2 मालमत्तांची कागदपत्रं देखील ईडीकडून मागण्यात आले आहे. तिचे वडील आणि भाऊ ज्या 2 कंपन्यांचे संचालक आहेत, त्याबाबत देखील काही प्रश्न विचारण्यात येत आहेत. जवळपास 3 तासांहून अधिक काळ रियाची चौकशी अद्याप सुरू होती. दरम्यान तिचा भाऊ शौविक ईडी ऑफिसमधून बाहेर पडला आणि पुन्हा तासाभरात कपडे बदलून चौकशीसाठी ईडी ऑफिसमध्ये दाखल झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

दरम्यान सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. रिया चक्रवर्ती अखेर ईडी कार्यालयात पोहोचली आहे. त्यापाठोपाठ आता श्रृती मोदीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. तब्बल 50 हुन अधिक दिवसानंतर सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला आता नवीन मिळालं आहे. सीबीआयने तक्रार दाखल केल्यानंतर ईडीनेही चौकशीला सुरुवात केली आहे. रिया ईडी कार्यालयात दाखल झाल्यानंतर काही तासांनी श्रुती मोदीलाही चौकशीसाठी बोलोवण्यात आले आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या केससह सीबीआय चौकशीमध्ये श्रुतीचे नाव आहे. त्याचप्रमाणे सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला देखील समन्स पाठवल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहे श्रुती मोदी?

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांबरोबर श्रुती मोदी हे देखील नाव आहे. यानंतर श्रुती मोदीचे सुशांतच्या मृत्यूशी काय कनेक्शन आहे, असे सवाल उपस्थित झाले होते. दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की, श्रुती मोदी या महिलेने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. सुशांतच्या कंपनीमध्ये रिया-शोविकचे सर्व काम श्रुती पाहायची. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी याआधी श्रुतीची चौकशी केली आहे. आता पाटणा पोलीस देखील तिच्या पत्त्यावर जाऊन श्रुतीची चौकशी करू शकतात. यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी धागेदोरे सापडतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

आपलं सरकार