AurangabadCrimeUpdate : महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून निलंबित डाॅ गितेंवर विनयभंगाचा गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – जिल्हापरिषदेतील निलंबित जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.अमोल गिते यांच्या विरोधात महिला वैद्यकीय अधिकार्‍याने सिडको पोलिसांना विनयभंगाची तक्रार देताच गुन्हा दाखल झाला आहे.
लाॅकडाऊन च्या काळात डाॅ.गितेंवर त्यांच्याच पत्नीने बदनापुर पोलिसांना फोन करुन वडलांसाठी पैसे  आणि मद्य घेऊन जात असतांना पकडून दिले होते. या प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती .त्यानंतर तीन महिन्यांनी एका महिला वैद्यकीय अधिकार्‍याने डाॅ.गितेंच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी डाॅ.गिते है सतत फोन करुन त्रास देतात.त्यांचा नंबर फिर्यादीने ब्लाॅक करुन ठेवल्यानंतर फिर्यादीच्या पतीच्या फोनवर करुन शिवीगाळ करंत जीवे मारण्याची धमकी दिली. वरील प्रकरणी पोलिसनिरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस काॅन्सटेबल हिवाळे करंत आहेत.

Advertisements

आपलं सरकार