AurangabadCrimeUpdate : दुकान फोडून ९५ हजार लांबवणारे, दहा दिवसांनी गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – राजनगर मुकुंदवाडी परिसरातील किराणा दुकान फोडून ९५हजार रु. लंपास करणार्‍या दोघांना तब्बल १०दिवसांनी मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
आकाश रमेश झिने(२४) व संदीप विठ्ठल शेळके(२०) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
गेल्या २०तारखेला गजानन राजपूत(२८) यांचे राजनगर परिसरातील किराणा दुकान चोरट्यांनी फोडून दुकानातील ९५हजार रु.लांबवले होते. खबर्‍याने पोलिस निरीक्षक आंगळे यांना आरोपींचा ठाव ठिकाणा सांगताच पीएसआय बांगर यांनी पथकासहितत जाऊन आरोपींना अटक केली.पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदवाडी पोलिस करंत आहेत

Advertisements

आपलं सरकार