Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationUpdate : CBSC पाठोपाठ ICSE बोर्डानेही घेतला हा महत्वपूर्ण निर्णय ….

Spread the love

कोरोना बरोबरच देशातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाची सर्वत्र चर्चा चालू असून CBSC बोर्डानं दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर आता ICSE बोर्डानंही या निर्णयाला संमती दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे  सांगितलं आहे. परीक्षा रद्द झाल्यानं महाराष्ट्रासह देशभरातील ICSE बोर्डाच्या विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि , सीबीएससी बोर्डाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय आला आहे. 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सीबीएससी बोर्डानं आपली बाजू कोर्टात मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. सीबीएससी (CBSC) आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा कधी होणार होणार की रद्द केल्या जाणार याबाबत अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होता. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर या परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशभरात CBSC आणि ICSE बोर्डाच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रातही दहावी-बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ICSE बोर्ड आणि CBSC बोर्डाच्या उर्वरित परीक्षांबाबत निर्णय़ येणं बाकी होतं. सुप्रीम कोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या असून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत कोणताही विचार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. ICSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांच्या हातात निकाल मिळण्याची आशाही वाढली आहे. CBSC बोर्डानं घेतलेल्या निर्णयाचं ICSE बोर्ड अनुसरण (Follow) करेल असंही बोर्डाकडून कोर्टात सांगण्यात आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!