Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रवीण दरेकर यांनी केला धक्कादायक गौप्यस्फोट , कोरोनाच्या रुग्णाआड दलालंचे मोठे रॅकेट

Spread the love

कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह करून देणारी दलालांची रॅकेट राज्यात सक्रिय आहेत. भिवंडीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा महाभयंकर प्रकार नुकताच उघडकीस आणला आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. सरकारनं याची गंभीर दखल घ्यायला हवी,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे. करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर आज औरंगाबादमध्ये आले होते. वैद्यकीय व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांनी आज विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात करोना संसर्गाच्या साथीची परिस्थिती भयंकर असल्याचा आरोप केला.

‘सरकारच्या चुका लक्षात आणून दिल्या की आमच्यावर राजकारण केल्याचा आरोप होतो. करोनावर कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ नये. सरकारच्या अपयशापासून सगळं लक्ष विचलित व्हावं यासाठी भाजपवर राजकारणाचा आरोप केला जातो. त्यासाठी कधी केंद्राकडं बोट दाखवले जाते तर कधी अस्मितेचे प्रश्न उभे केले जातात. हा सगळा केविलवाणा प्रकार आहे,’ असे दरेकर म्हणाले.राज्यात दलालांची अनेक रॅकेट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

एखाद्या रुग्णाचा रिपोर्ट कुठल्या हॉस्पिटलला पाठवायचा याचा निर्णय हे दलाल घेत आहेत. त्यांची रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालयांशी ‘डील’ झालेली असते. मात्र, हे महाभयंकर प्रकार सरकारला माहीतही नाहीत,’ असं दरेकर म्हणाले. मुंबईसारख्या ठिकाणी आतापर्यंत केवळ दुर्लक्षामुळं अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनची यंत्रणा नाही. रुग्णवाहिका नाही आणि व्हेंटिलेटरही नाही, अशी मुंबईची अवस्था आहे,’ असं ते म्हणाले. ‘सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे. त्याला प्रचंड त्रास होत आहे. हॉस्पिटलची बिलं परवडत नाहीत. लॅबवरही सरकारचा कंट्रोल राहिलेला नाही. खासगी रुग्णालये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेत आहेत. सरकारच्या कारवाईच्या इशाऱ्याला ते भीक घालत नसल्याचं दिसत आहे. सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. लोकांना खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या बिलाच्या पैशाचा परतावा दिला पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!