Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तडीपारी संपताच बुलेट चोरली, रेकाॅर्डवरच्या दोघांसहित एक गुन्हेशाखेच्या जाळ्यात

Spread the love

औरंगाबाद – सराईत मोटरसायकल चोर आणि कुख्यात बाबला च्या जोडीदारासहित एका वाहनविक्री एजंटाला गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या.त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली ८०हजार रु.ची आणि चोरी केलेली ७०हजार रु.ची बुलेट असा एकूण दीड लाख रु.चा ऐवज जप्त केला.या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात ४जून रोजी गुन्हा दाखल झाला होता.
समीर देविदास चित्ते(२२) रा.मंजूरपुरा,महंमद रिहानपिता महंमद रिजवान(२२)रा.सिटीचौक आणि अदिबखान पिता जुनेदखान रा.लोटाकारंजा अशी अटक आरोपींची नावे आहेत.शहानूरमियाॅं दर्गा चौकात वरील आरोपी बुलेट विक्रीसाठी ६जूनच्या मध्यरात्री १२वा.येणार असल्याची माहिती खबर्‍याने एपीआय अजबसिंग जारवाल यांना दिली होती.त्यानुसार सापळा रचून तिघांना बेड्या ठोकल्या.यागुन्ह्यातील समीर चित्ते हा गेले वर्षभर तडीपार होता. तडीपाराच्या काळातही गुन्हेशाखेने दोनदा चित्तेला अटक केली होती.नुकतीच चित्तेची तडीपारी संपली होती.तर मो.रिहान हा बेगमपुरा खुनप्रकरणातील कुख्यात बाबला चा साथीदार आहे. त्यानेही हर्सूल कारागृहात २२महिने काढले शेवटी पोलिसांना रेहान विरोधात पुरावे न मिळाल्याने तोही नुकताच निर्दोष सुटुन आला होता. तर तिसरा आरोपी अदिबखान हा सेकंडहॅंड वाहनांचा खरेदी विक्री एजंट आहे.
वरील कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ.नागनाथ कोडे,पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्ग दर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल पोलिस कर्मचारी शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, राजेंद्र साळुंखे,संजयजाधव, संदीप क्षीरसागर, प्रभाकर राऊत यांनी पार पाडली.

मोबाईल चोरही पकडला

त्याच प्रमाणे क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दाखल असलेला मोबाईल चोरीचा गुन्हा एपीआय मनोज शिंदे यांनी उघडकीस आणला.या प्रकरणी खुल्ताबादचा रहिवासी फैरोज अफरोज शेख याला पैठणगेट परिसरात अटक केली.फेरोज ने ९हजार रु.किमतीचा मोबाईल ३हजार रुपयात खुलताबादच्याच शेख कलीमोद्दीन गुलामबुर्‍हानोद्दीन यास आई आजारी असल्यामुळे पैशाची निकड दाखवंत विकला. हा व्यवहार होत असतांनाच एपीआय मनोज शिंदे यांनी शेख कल्लीमोद्दीन ला ताब्यात घेत फिरोज चा पत्ता विचारला तेंव्हा फिरोज पैठणगेट वरील पार्किंंगमधे उभा होता. त्यास पकडून जाब विचारताच फेरोज ने गुन्ह्याची कबुली दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!